Video: क्वॉरंटाइनची बातमी दिली म्हणून पत्रकाराच्या घरावर मोर्चा काढून घातला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

दोनशे महिला व पुरुषांनी जमावबंदीचा आदेश मोडत स्थानिक पत्रकाराच्या घरावर मोर्चा काढला. शिवीगाळ करीत त्यांनी तेथे गोंधळ घातला.

सोनई: पानेगाव (ता.नेवासे) येथील सतरा कुटुंबांना क्वारंटाइन केल्याची बातमी वर्तमानपत्रात दिल्याच्या रागातून आज सकाळी दोनशे महिला व पुरुषांनी जमावबंदीचा आदेश मोडत स्थानिक पत्रकाराच्या घरावर मोर्चा काढला. याबाबत चार तास उलटूनही सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.

हेही वाचा - पोलिस का बडगा खाया और घी भी

मागील आठवड्यात नेवासे येथे कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात पानेगाव येथील एक कंपाउंडर आल्याची माहीती पुढे आली. ही बाब तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तेथील शिक्षक संदीप जंगले यांना सांगितली. जंगले यांनी एका दैनिकाचे स्थानिक पत्रकार,पोलिस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष व दक्षता समिती अध्यक्षास माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे व पथकाने पानेगाव येथील सतरा कुटुंब व अन्य सात व्यक्तींना 
क्वारंटाइन केले होते.

तर मग आम्ही गुन्हा नोंदवू

क्वारंटाइन केल्याची बातमी एका वर्तमानपत्रात (सकाळ नव्हे) येताच आज सकाळी आठ वाजता दोनशे महिला व पुरुषांनी जमावबंदीचा आदेश मोडत स्थानिक पत्रकाराच्या घरावर मोर्चा काढला. शिवीगाळ करीत त्यांनी तेथे गोंधळ घातला.

सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे व पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनेच्या चार तासानंतर गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित पत्रकार फिर्याद देण्यास आला नाही. तो नाहीच आला तर पोलिसच फिर्यादी होवून गुन्हा दाखल केला जाईल. असे पोलिसांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People's front at the journalist's house