पोलिस का बडगा खाया और घी भी....

Police think a million food packets a day
Police think a million food packets a day

नगर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची गैरसोय झाली. मात्र, नगर शहर व परिसरात गरजू दोन हजार कुटुंबांच्या मदतीसाठी पोलिस धावले.

अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील आणि उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पुढाकारातून आठ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कुटुंबांना महिनाभर पुरेल इतका किराणा उपलब्ध करून दिला. संकटकाळात खाकीतही माणुसकी दिसल्याची भावना गरजूंनी व्यक्‍त केली. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन आवश्‍यक आहे. मात्र, मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणारे आणि छोट्या व्यावसायिकांचे या काळात प्रचंड हाल होण्याची शक्‍यता होती. भटक्‍या समाजाच्या पोटाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही गरज लक्षात घेऊन पोलिस दलातील अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील आणि उपअधीक्षक संदीप मिटके यांनी काही स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन गरजूंची भूक भागविण्याचा उपक्रम सुरू केला. 

गेल्या 21 दिवसांत त्यांनी हजारो कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्त्यांवर जाऊन ते लोकांना किराणा माल देत होते. शहर परिसरातील बंजारा, बहुरूपी, गोंधळी, डोंबारी, आदिवासी, पारधी समाज, मोमीन वस्ती, पोखर्डी, दिव्यांग, तृतीयपंथी, विधवा, परप्रांतीयांसह रेल्वेस्थानक, रामवाडी, काटवन खंडोबा परिसरातील गरजूंना किराणा साहित्याचे वाटप केले. 
संकटकाळात किराणा मिळाल्याने या वस्तीवरील लोक भावुक झाले. पोलिसांच्या खाकी वर्दीत माणूस पाहिल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. लॉकडाउन असेपर्यंत घरातच बसा. बाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन पोलिसांनी केले. 

एक लाख फूड पाकिटे 
रोज एका वस्तीला किराणा देण्यासह निवारा नसणाऱ्या लोकांना जेवण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांतर्फे पोलिसांनी एक लाख पाकिटांचे वाटप केले. त्यासाठी सात ते आठ स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली. 

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी बडगा उगारला. त्याची चर्चा दोन्ही अंगाने सुरू आहे. मात्र, बडगा उगारणारे पोलिस लोकांना घी सुद्धा घाऊ घालीत आहेत. त्याचीही चर्चा नगरमध्ये सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com