मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजूर, पण मावेजा कमी

राजकुमार शहा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मोहोळ : मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजुर झाला आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी असून तो शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे पाचपट मोबदला मिळाला पाहिजे, तसेच फळ झाडांच्या किमतीही योग्य मिळाल्या पाहिजेत या सर्व बाबी योग्य झाल्याशिवाय अॅवॉर्ड पाठवु नये, अन्यथा यापुढील अंदोलन या पेक्षाही तीव्र राहील असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख चरणराज चवरे यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या संपादीत जमिनीचे मूल्यांकन योग्य प्रकारे व्हावे , त्यांना त्रास देऊ नये , सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवाय अॅवॉर्ड पाठवु नये या सह अन्य मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोहोळ पंढरपुर मार्गावरील मगरवाडी फाटा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गणेश वान कर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला त्यावेळी चवरे बोलत होते.

यावेळी सेनेचे दिपक गायकवाड, अस्मीता गायकवाड, श्रीमती येलुरे, तालुका अध्यक्ष अशोक भोसले, सिमा पाटील, बळीराजाचे संजय घाटणेकर, माऊली हळणवर सोमनाथ वाघमोडे, लक्ष्मण धनवडे, धनाजी पुजारी, अंगद रणदिवे, पंकज देवकते, तेजस बोबडे, सिकंदर धोत्रे, संतोष चव्हाण, देवानंद चवरे, शहाजहान शेख, ज्ञानेश्वर जवळेकर, तानाजी सोनवणे, संजय लवटे आदिंसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर म्हणाले अधिकाऱ्यांनी नकाशे चुकविले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागताहेत हा प्रकार बंद झाला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, सोमनाथ वाघमोडे, संजय घाटणेकर, लक्ष्मण धनवडे यांनी मनोगते व्यक्त केली. आंदोलकांचे निवेदन पंढरपूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रियाज मुलाणी यांनी स्विकारले. रास्तारोकोमुळे पंढरपूर व मोहोळकडील बाजुस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंदोलन मोहोळ व पंढरपूरच्या सिमेवर असल्यामुळे मोहोळ व पंढरपूर पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: permission for mohol to alandi palakhi but reward is less