सोलापुरच्या समांतर जलवाहिनीचा मार्ग मोकळा 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सोलापूर : उजनी ते सोलापूरदरम्यान समांतर जलवाहिनी टाकण्याची योजना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीऐवजी महापालिकेनेच राबवावी, असा ठराव मंगळवारी रात्री उशीरा एकमताने मंजूर करण्यात आला. त्याच वेळी या संदर्भातील सर्व पत्रव्यवहार करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचाही निर्णय झाला. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरण ते सोलापूरदरम्यान 110 दशलक्ष लिटर क्षमतेची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी 449.64 कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आला आहे. ते काम स्मार्ट सिटी कंपनीकडून करून घेण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 449.64 कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी "एनटीपीसी'कडून 250 कोटी रुपये आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून 200 कोटी, अशा एकूण 450 कोटी रुपयांतून ही कामे केली जाणार आहेत, असा प्रशासकीय प्रस्ताव होता. 

या प्रस्तावास कॉंग्रेसचे चेतन नरोटे व बसपचे आनंद चंदनशिवे यांनी हरकत घेतली. सध्या उपलब्ध झालेला निधी पडून आहे. त्यामध्ये शासनाचा काहीच वाटा नाही. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी अमृत योजनेतून 300 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती, ती रक्कम कुठे आहे, असा प्रश्‍न या दोघांनी उपस्थित केला. या योजनेबाबत राज्य शासनाने महापालिकेस केवळ "गाजर'च दाखविल्याची टीका त्यांनी केली. 

या प्रस्तावावर शिवसेनेने प्रस्तावित योजना स्मार्ट कंपनीऐवजी महापालिकेने राबवावी. त्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशी उपसूचना मांडली. ती दुरुस्तीसह एकमताने मंजूर करण्यात आली. 

 पहिल्या टप्प्यात होणारी कामे 
- उजनी धरणात जॅकवेल बांधणे 
- पंपिंग मशिनरी बसविणे 
- उजनी ते पाकणी ते सोरेगावपर्यंत जलवाहिनी टाकणे 
- महामार्ग व रेल्वे क्रॉंसिंगची कामे पूर्ण करणे 
- "एनटीपीसी'बाधित तीन गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे 

Web Title: permission for parallel water line in solapur