Peth: ट्रक मालकांकडून ड्रायव्हरचा सत्कार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठ : ट्रक मालकांकडून ड्रायव्हरचा सत्कार सोहळा

पेठ : ट्रक मालकांकडून ड्रायव्हरचा सत्कार सोहळा

त्याचं गाव आणि त्याचा संसार कोसोमैल दूर..तो ट्रक ड्रायव्हर.त्याने पेठ ता.वाळवा येथील ट्रकवर अहोरात्र मेहनत करून ड्रायव्हिंग केलं...ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता विना अपघात अविरतपणे ट्रक आणि मालक याच्याशी प्रामाणिक राहिला.ट्रक मालकाला आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं.त्या ट्रक चालकाचे नाव दादासाहेब राक्षे,रा.यावली, बार्शी,जि. सोलापूर. राक्षे यांच्या या सेवेबद्दल पेठ.ता.वाळवा येथे नागरी सत्कार झाला.राक्षे यांच्या ट्रकचे मालक संग्राम पाटील यांनी राक्षे यांना कार्यक्रमात सोन्याची अंगठी,पोशाख,आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट दिली.चालक राक्षे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.आपण केलेल्या सेवेचं चीज झालं.असं म्हणत दादासाहेब राक्षे यानी मालक संग्राम पाटील यांचे आभार व्यक्त केले.

पेठ येथील संग्राम पाटील यांचेकडे दादासाहेब राक्षे गेल्या पाच वर्षांपासून ट्रकवर ड्रायव्हिंग करतात.राक्षे यांनी आजपर्यंत कधीच गाडीचा अपघात किंवा गाडीचे नुकसान केले नाही.त्यांनी प्रामाणिकपणे ही सेवा केली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत संग्राम पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा: बेळगाव : ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पश्चिम ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली चे उपाध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले," शेतकऱ्यांचे पिकलेले धान्य माणसाच्या मुखात घालणारा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आणि शेतकरी जास्त श्रेष्ठ आहेत.ड्रायव्हवर चा सत्कार हा आदर्श संग्राम पाटील यांनी निर्माण केला आहे.कोरोनाच्या काळात परदेशात एक लाख ट्रकचालकांनी संप केला. परंतु कोरोनाच्या काळात भारतातील एकाही ड्रायव्हर ने संप केला नाही. कोरोणाच्या काळात ड्रायव्हर लोकांनी देशाला जगविण्याचे काम केलं. त्यामुळे तो भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

"यावेळी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट यूनियनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, सांगली जिल्हा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष शंकरराव चिंचकर,स्वाभिमान मालवाहतूक ट्रक सांगली चे मच्छिंद्र यादव,सतीश जाधव, हेमंत डिसले, वामन चौगुले, विक्रम पाटील, स्वप्नील पाटील,राहुल पाटील,सदीप पाटील,संग्राम पाटील, प्रताप माने,यांची प्रमुख उपस्थिती होती.उपसरपंच शंकरराव पाटील यांनी आभार मानले.

ट्रक ड्रायव्हर हा देशाचा प्राण आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात कायम आदरभाव असायला हवा.

- बाळासाहेब कलशेट्टी, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट यूनियनचे अध्यक्ष

loading image
go to top