पेठनाका - इस्लामपूर मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा; रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे : दररोज होताहेत अपघात

Pethnaka - Islampur road becomes a death trap; Large potholes on the road: Accidents happen every day
Pethnaka - Islampur road becomes a death trap; Large potholes on the road: Accidents happen every day

इस्लामपूर (जि. सांगली) : पेठनाका - इस्लामपूर मार्गावर कापूरवाडी ते शिराळा नाका या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दररोज अपघात होत आहेत. यातून होणाऱ्या नुकसानीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. 


या मार्गावर प्रवास करणाऱ्या स्थानिक प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पेठ-इस्लामपूर हा मार्ग नेहमी वर्दळीचा आणि मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा मार्ग आहे. पावसाळ्यानंतर या मार्गावर छोटे छोटे खड्डे पडायला सुरुवात झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष दिले असते तर आजची भयावह परिस्थिती निर्माण झाली नसती; मात्र हा विभाग नेहमीच काही ना काही कारणे देत जबाबदारी झटकत असल्याची स्थिती आहे.

या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. याउलट या मोठ्या मोठ्या खड्डयांमुळे दररोज अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोठ्या खड्डयांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत, तर काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे. याचे कसलेच काहीच सोयरसुतक नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास काही पोलिस कर्मचारी यांनी संपर्क साधला असता त्यांना या विभागाने नेहमीप्रमाणे कागदोपत्री संदर्भ देत उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केला असल्याचा प्रसंग नुकताच घडला आहे.

हा मार्ग सध्या जरी केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असला तरी सामजिक भान राखत या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यासाठी स्थानिक पातळीवर या विभागाने औदार्य दाखवणे गरजेचे आहे. इस्लामपूर बांधकाम विभागाने असंवेदनशील न बनता, प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवून सध्या किमान रस्त्यातील खड्डे मुजवण्याचे काम तरी काम करावे, अशी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. 


रुंदीकरण राहू दे; खड्डे मुजवा 
हा मार्ग रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होईल तेव्हा होईल; परंतु तोवर सध्या खड्डे मुजवणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांचे होणारे हाल थांबतील आणि विनाकारण जाणारे जीव वाचतील. संबंधित विभागाने समन्वयाची भूमिका घेऊन पेठ नाका ते इस्लामपूर मार्गावर पडलेले मोठे खड्डे मुजवून प्रवाशांना वाहतुकीस रस्ता चांगला करावा अशी अपेक्षा आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com