जिल्हा परिषद प्रभाग रचना; आरक्षणाबाबत गटातून 60 हरकती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या प्रारूप आराखड्यावर व सोडत पद्धतीने निश्‍चित केलेल्या आरक्षणावर 77 हरकती घेतल्या. त्यामध्ये 60 जिल्हा परिषदेशी तर 17 हरकती पंचायत समितीशी संबंधित आहेत. हरकतींवर मंगळवारी (ता. 25) पुण्यात सुनावणी होणार आहे. दरम्यान, सुनावणीसाठी जावे लागणाऱ्यांची संख्या आणि होणारे आर्थिक नुकसान याचा विचार करता सुनावणी कोल्हापुरातच घ्यावी, अशी मागणी होत आहे.

या वेळी जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ (गट) रद्द झाले. त्यामुळे राहिलेल्या 67 मतदारसंघाचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. मतदारसंघांचा हा प्रारूप आराखडा व आरक्षण 5 ऑक्‍टोबरला जाहीर केले. हरकतींसाठी आज शेवटचा दिवस होता. आज शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसंदर्भात 32 हरकती आहेत. याअगोदर 28 हरकती आल्या आहेत. यात मतदारसंघाच्या आरक्षणाबाबत हरकतींची संख्या अधिक आहे. बुधवारपर्यंत आलेल्या 28 हरकतींमध्ये 10 हरकती प्रभागांच्या तर 18 तक्रारी आरक्षणासंदर्भातील आहेत.

पंचायत समितीच्या प्रभाग रचना व आरक्षणाबाबतच्या हरकती केवळ 17 आल्या आहेत. यात सर्वात अधिक नऊ हरकती करवीर पंचायत समितीच्या गणाबाबत आल्या आहेत. याशिवाय राधानगरी एक, शिरोळ व चंदगड प्रत्येकी तीन आणि शाहूवाडी पंचायत समिती कार्यक्षेत्रातून केवळ एक हरकत आली आहे.

पुण्यात सुनावणीमुळे प्रमाण कमी
गटाची किंवा गणांची रचना तसेच आरक्षण याबाबतच्या हरकतींवर पुण्यात एकत्रितपणे आणि एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. शिवाय सुनावणीची पद्धत, अधिकाऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद, सुनावणी काय होणार, यांची बहुतांशी कार्यकर्त्यांना पुसटशी कल्पना असते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने हरकतींचे प्रमाण कमी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

Web Title: petition on zp ward strucutre & reservation