पेट्रोलच्या टॅंकरना जेव्हा आग लागते....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मिरज - येथील इंडियन ऑईल इंधन डेपोमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. इंधन वाहतूक, वितरण, गॅसपुरवठा इत्यादी विभागांचे अधिकारी सहभागी झाले. या उपक्रमात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानेही प्रथमच सहभाग घेतला. 

डेपोंना इंधनपुरवठा करणाऱ्या रेल्वे वॅगनला आग लागल्याची वर्दी देण्यात आली आणि यंत्रणेची धावपळ सुरू झाली. फोमचा मारा करण्यात आला. महापालिकेचे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने आग नियंत्रणात आणली. जखमी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत पुरवली. पाण्याचा मारा करून वॅगनचे तापमान नियंत्रणात आणले. पोलिस, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन ही सर्वच पथके निर्धारित वेळेत पोचली; त्यामुळे रंगीत तालीम यशस्वी झाली. या वेळी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख राजेंद्र पाटील, रफिक नदाफ, अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ, जिल्हा शल्यचिकित्सक संजय सावंत, औद्योगिक सुरक्षा दलाचे उपसंचालक अभिजित अवसरे, नायब तहसीलदार एस. आर. सावंत, इंडियन ऑईलचे व्यवस्थापक मिलिंद वाघमारे, सुरक्षा अधिकारी अभिजित गळतगे, कृष्णा गुरव, राकेश कुमार, पी. मांगीलाल, किरण वाघंबरे, आशिषकुमार, आशुतोष चिंतामणी कांबळे आदी 
उपस्थित होते.

Web Title: petrol tanker fire