...म्हणून त्याने आईला मारले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

फलटण शहरामध्ये बारामती रोडवर रात्री तो येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.  

फलटण शहर : आईच्या खूनप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून फरारी असलेल्या संशयित मुलास फलटण शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. सुलतान रशीद शेख (वय 30) असे त्याचे नाव आहे. आईची वर्तणूक चांगली नसल्याने व तिला दारूचे व्यसन असल्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने आईचा खून केल्याचे त्याने सांगितले आहे. 
 
चौधरवाडी (ता. फलटण) येथील दत्तनगरच्या शेतीतील वस्तीवर राहणाऱ्या आरिफा रशीद शेख (वय 45) यांचा पाच महिन्यांपूर्वी राहत्या घरी खून झाला होता. या घटनेनंतर आरिफा यांचा मुलगा सुलतान हा फरार होता. अंत्यविधीलाही तो हजर नव्हता. हा खून त्यानेच केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला. 

फलटण शहरामध्ये बारामती रोडवर रात्री तो येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.  
आईची वर्तणूक चांगली नसल्याने व तिला दारूचे व्यसन असल्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने आईचा खून केल्याचे त्याने सांगितले आहे. पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप पोमण, हवालदार विद्याधर ठाकूर, सुजित मेंगावडे, नितीन चतुरे, शरद तांबे व सर्जेराव सूळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रताप पोमण तपास करीत आहेत.

हेही वाचा -  ...म्हणून फलटणकरांनी घुमवला जय महाराष्ट्राचा नारा 

जरुर वाचा - साताऱ्यात हाेऊ शकत नाही ते माढ्यात हाेणार ?

नक्की वाचा - Video पहा : धाडसी युवकांमुळे शिराळ्याच्या पाटलांचा वाचला प्राण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Phaltan Police Arrested Son Who Killed Mother