फलटणच्या साखर कारखाना व्यवस्थापकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

सांगली : फलटण (जि. सातारा) येथील जवाहर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील गजानन पुजारी (वय 49) यांनी येथील गाव भागातील तृप्ती लॉजमध्ये विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी पुजारी यांनी चिठ्ठी लिहिली आहे. ती पोलिसांनी पंचनामा करून जप्त केली. चिठ्ठीत काही संशयितांच्या नावांचा उल्लेख आहे. त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे.

पुजारी मूळचे इचलकरंजीचे रहिवासी आहेत. 1995 मध्ये हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यात अकाउटंट म्हणून ते रुजू झाले. तेथे ते व्यवस्थापकपदापर्यंत पोचले. कारखान्याच्या संचालक मंडळाने 2008 मध्ये फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतला. हुपरी येथील बरेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची फलटणच्या कारखान्यात बदली केली. पुजारी हेदेखील 2008 पासून जवाहर श्रीराम सहकारी साखर कारखान्यात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. उत्पादन व्यवस्थापन व मुख्य लेखाधिकारी अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती.

Web Title: phaltan's sugar factory manager commits suicide