राजे की राजकारणी ? जबाब द्या

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

गळ्यात अरबी रुमाल घालून मिश्‍यांना ताव देत मुस्लिम तरुणांना भुरळ घालणारे धाकटे राजे, दर्ग्यावर जाऊन हिरवी पगडी बांधून दर्शन घेऊन "आपण सबका राजा है " असा संदेश ठणकावून देणारे थोरले राजे. तुम्ही उत्तर द्या अशी अपेक्षा युवकाने व्यक्त केली आहे.

सातारा : एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधी कृती समितीचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आजचा (सोमवार) या आंदोलनाचा 18 वा दिवस आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील महिला सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनस्थळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी एकेक दिवस येथून आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्र सेवादलाचे व हम भारत के लोगचे अस्लम बागवान दिल्लीला जात असताना त्यांनी साताऱ्यात येऊन रविवारी (ता. 23) आंदोलनस्थळी भेट दिली. दरम्यान साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे आणि विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या आंदोलकांची 17 दिवसांत भेट न घेतल्याने मुस्लिम समाजातील युवक नाराज झाले आहेत.

जुनेद शेख या युवकाने आपली नाराजी आणि राजेंकडून असलेली अपेक्षा समाज माध्यमातून व्यक्त केली आहे. साताऱ्याच्या दोन्ही राजेंना मागच्या 16 - 17 दिवसापासून सीएए आणि एनआरसीच्या विरोधात कडक उन्हाच्या झळा सोसत बसलेल्या माता भगिनींची साधी विचारपूस ही करावीशी वाटली नाही???? का ओ असं ? असा भावनिक प्रश्‍न जुनेदने विचारला आहे. त्यापुढे जाऊन त्याने राजे मंडळींना काही प्रश्‍नांची उत्तरे मागितली आहेत. यामध्ये त्याने #जबाब_द्या असा हॅशटॅगचाही वापर केला आहे. साताऱ्याचे राजघराणे हे सर्वसामान्यांमध्ये विविध जाती धर्मांमध्ये मिळून मिसळून असते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेलल्या एनआरसी, सीएए विरोधी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करावयास हवी, अशी भावना जुनेदच्या लेखणीतून व्यक्त होत आहे. त्याची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यात व्यक्त केलेल्या भावनांवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
 
जरुर वाचा : Video : बाप हो देव पाहिला का देव ?

जूनेद लिहितो #जबाब_द्या #राजेआहातकीनिव्वळराजकारणी मतं मागण्यासाठी गल्ली बोळात फिरून मतं मागणारे सातारचे तुमचे आमचे लाडके दोन्ही राजे, (त्यातही मुस्लिम वस्त्यांना लक्ष ठरवून), 
गळ्यात अरबी रुमाल घालून मिश्‍यांना ताव देत मुस्लिम तरुणांना भुरळ घालणारे धाकटे राजे, 
दर्ग्यावर जाऊन हिरवी पगडी बांधून दर्शन घेऊन "आपण सबका राजा है " असा संदेश ठणकावून देणारे थोरले राजे. 
या दोघांनाही मागच्या 16 - 17 दिवसापासून CAA - NRC च्या विरोधात कडक उन्हाच्या झळा सोसत बसलेल्या माता भगिनींची साधी विचारपूस ही करावीशी वाटली नाही???? 
का ओ असं? 

वाचा सविस्तर : आजच्या परिस्थितीबद्दल उदयनराजे म्हणाले...

स्पष्टीकरण: राजे की राजकारणी याचा, 
राजा हा रयतेच्या हिताचे निर्णय घेतो त्याच्यासाठी 
पक्ष , राजकारण काही महत्व ठेवत नाही . 
CAA सर्वसामान्यजनतेच्या विरोधात आहे , 
त्यामुळे त्यांनी राजा म्हणून निर्णय घ्यावा =O 

(माझं खानदान मतं देत आलंय म्हणून विचारतोय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question Raised For Udayanraje And Shivendraraje From NRC And CAA Protestor