
Phone Scam Sangli
esakal
Cyber Crime Sangli : मोबाईलवर कॉल येतो... काही क्रमांक दाबले काय जातात... त्यानंतर एक तोतया अधिकारी हिंदीतून बोलतो अन् सामान्य नागरिक तिथेच घाबरून जातो... अशा प्रकारांत विश्रामबाग-सांगलीतील दोघे ज्येष्ठ नागरिक अडकले. या दोन्ही घटनांत डिजिटल अरेस्ट आणि बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालत भामट्यांनी त्यांना एक दोन नव्हे, तर तब्बल ३७ लाखांचा गंडा घातला. पोलिस प्रशासन आणि सरकारकडून सातत्याने बनवेगिरीविषयी प्रबोधन करूनही अनेक जण बळी पडतात. नागरिकांनी आता, तरी सतर्क व्हावे, अनोळखी क्रमांक उचलू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.