सोलापूर डीसीसीच्या कारवाई विरोधात याचिका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात संचालक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. 

तत्कालीन चेअरमन व माजी आमदार राजन पाटील म्हणाले, सहकार विभागाने चुकीचे आकडे दाखवून ही कारवाई केली आहे. आरबीआय सध्या सरकारच्या हातचे बाहुले झाले आहे त्यामुळे न्यायलयानेच आता बँकेच्या कारभाराची फेर चौकशी करावी. याचिका कर्त्यांचे वकिल अॅड.अभिजीत कुलकर्णी म्हणाले, याचिकेवर कधी सुनावणी होणार आहे हे उद्या समजेल.

Web Title: PIL against Solapur DCC Bank