सोलापूरच्या पियुषने केले बिगबॉसविजेत्या मेघाचे ऑनलाइन प्रमोशन!

परशुराम कोकणे
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर : दहावी, बारावीनंतर ठरलेल्या वाटेने जाणे अनेकजण पसंत करतात. डॉक्‍टर, इंजिनिअर होण्यासाठी अनेकांची धडपड दिसून येते. शिक्षण घेऊनही अनेकजण बेरोजगार असल्याचेही दिसून येते. करिअर म्हणून काहीतरी वेगळं विचार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. अशांपैकीच एक आहे सोलापूरचा पियुष सुप्रिया. पियुष याने मराठी बिग बॉसची विजेती अभिनेत्री मेघा धाडेची सोशल मीडियावरील ब्रॅण्डींगची जबाबदारी स्वीकारून ती यशस्वी करून दाखविली आहे. 

पियुष हा सोलापूरच्या संगमेश्‍वर महाविद्यालयात शिकायला होता. बारावीनंतर त्याने सोलापुरातच ऍनिमेशनचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो करिअर करण्यासाठी मुंबईत गेला. सोशल मीडियाच्या अनुषंगाने त्याने अनेक छोटे-मोठे तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. सोशल मीडिया अँड पीआर ब्रॅण्डबाजा सोशल या कंपनीची सुरवात त्याने केली. अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता अंकुश चौधरी यांच्यासह अनेक चित्रपटांचे सोशल मीडिया प्रमोशन पियुष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले. मराठी बिग बॉस कार्यक्रमाची सुरवात होण्याच्या दोन दिवस आधी अभिनेत्री मेघा धाडे यांनी त्यांच्या ऑनलाइन प्रसिद्धीची जबाबदारी पियुष आणि त्याच्या टीमकडे दिली. 100 दिवस बिग बॉसच्या घरातील मेघा धाडे यांचे लुक बारकाईने प्रमोट करण्यात आले. इन्स्टाग्रामवर तीन हजार फॉलोवर्सची संख्या 50 हजारांवर गेली आहे. फेसबुक, ट्‌विटरच्या माध्यमातूनही मेघा लाखो रसिकांपर्यंत पोचली आहे. मेघा बिग बॉसची विजेती झाल्याने पियुष आणि त्याच्या टीमची जबाबदारी अधिकच वाढली आहे. पियुषच्या या यशाबद्दल आजी सिद्धेश्‍वर कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका शैलजा राणभरे, आई सुप्रिया यांच्यासह मित्रांनी अभिनंदन करून त्याचा अभिमान असल्याचे सांगितले आहे. 

आजवर अनेक चित्रपटांचे, कलाकारांचे सोशल मीडियावरील ब्रॅण्डींग मी केले आहे. बिग बॉस कार्यक्रम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी अभिनेत्री मेघा धाडे यांनी आमच्या टीमकडे ऑनलाइन प्रसिद्धीची जबाबदार दिली होती. 100 दिवस बिग बॉसच्या घरात चालू असलेल्या कार्यक्रमातून मेघा यांच्या विविध लुक आणि वादसंवाद अत्यंत बारकाईने प्रमोट केले. 
- पियुष सुप्रिया

Web Title: piyush from solapur does online promotion of bigg boss winner megha dhade