मंगळवेढ्यात लोकसहभागातून बहरली वनराई

forest
forest

मंगळवेढा : संपूर्ण महाराष्ट्राला संतांची भूमी व दुष्काळी भाग असलेल्या शहराजवळील कृष्ण तलावाजवळ लोकसहभाने उभी वनराई ही सध्या मंगळवेढेकरांना कास पठारावरील फुल दर्शनाचा अनुभव देवू लागली.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून कृष्ण तलावांमधील 50 एकराच्या जागेतील 15 एकर जागेमध्ये अशी देखणी वणराई उभी केली.1972 सालातील हे तलाव गाळाने भरले परंतु जलयुक्त शिवारमुळे या तलावातील गाळ व  फिरंगी झाडे काढून स्वच्छ केल्यामुळे या तलावात शुध्द पाण्याचा साठा झाला.ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या भागात रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, मोहन जोंधळे, महेश पाटील, प्रशांत काटे यांनी या भागातील लोकांना सोबत घेवून या ठिकाणी  फुलपाखरं साठी  फुलपाखरू उदयन,पाम उद्यान,आमराई  जोपासण्याचा काम सुरू आहे.उंबर, वड, पिंपळ, आवळा, करंजे, खैर, आंबा, सप्तपर्णी, चेरी, निंब, चिंच इत्यादी अनेक प्रकारची झाडे लावली. तसेच सदाफुली, चिनी गुलाब, वेलवेट, डेलीया, तुळशी इत्यादी अनेक प्रकारच्या फुलांची बाग लावली.ठिकाणी 4800 रोपांची लागवड करून ठिबक सिंचनने ही झाडे जगविण्यात आली.आता हा परिसर रमणीय झाला.

त्यामुळे सध्या वरिष्ठ पातळीवरून दुष्काळी तालुका म्हणून एखादी शासकीय योजना देण्यास देखील शासनाकडून अन्याय होत असताना लोकांच्या यांच्या सहभागातून वनराईकडे पर्यटक आकर्षित होईल अशी वनराई उभी केली.त्यामुळे या भागात व्यवसाय सुरु करण्यास चालना मिळणार आहे. शहरात असणारे पोलीस स्टेशन न्यायालय तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय हे शहराबाहेर गेल्यामुळे या ठिकाणांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे भविष्यात इतर शासकीय कार्यालयही बाहेर गेल्यास शहरातील बाजारपेठ देखील बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शहराला शहरातील व्यावसायिकांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, किल्ला, पोलिस वसाहत व न्यायालय या ठिकाणी शहरातील तेरा संत शहरातील विविध संतांची माहिती देणारी वास्तू उभी केल्यास पर्यटकांचा ओढा वाढून पर्यायाने तालुक्यात पुन्हा व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. दरवर्षी पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी पदवीधर होत असून उत्तीर्ण विद्यार्थ्यात पन्नास विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात बाकी तरुणांसमोर रोजगाराचे साधन नसल्यामुळे बेरोजगार व्हावे लागत आहे त्यामुळे त्यांच्यासमोर व्यसनाधीनता समोर उभी राहिली अशा परिस्थितीमध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण झाल्यास तालुक्यातील बेरोजगारांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होणार आहे.त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे

कृष्ण तलाव परिसरात ऑक्सीजन पार्क,ट्रॅकीग,फिरण्यासाठी रस्ते आदी सुविधा देताना या ठिकाणी 42 प्रकारचे पक्षी  व फुलपाखरू पाहण्यास मिळणार आहे. शहरातील बंद कार्यालयाच्या जागी 13 संताचा इतिहास व शहरातील प्रमुख संतांची माहिती जीवन चित्र बाकीच्या अध्यात्मिक ग्रंथालय व संताच्या जीवन चरित्र साठी लेझर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांच्या घटना व चरित्र उभारणी व ग्रंथालय अशी अद्ययावत इमारत लोकसहभागातून उभी राहिल्यास या परिसरात 70 ते 80 दुकानदाराना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
- राहुल शहा, अध्यक्ष कृष्ण तलाव संवर्धन समिती

थोड्या दिवसात या परिसरातील खुल्या जागेत आणखीन पंधरा हजार नवीन झाडे लावून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे त्यामुळे हा परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरण्याच्या दृष्टीने आम्ही लोकसहभागातुन अभिनेते सयाजी शिंदे याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.
- महेश पाटील, मातोश्री फाउंडेशन

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संत सृष्टीसाठी शासकीय जागांची मागणी बाबतचा पत्रव्यवहार केला आहे त्यासंबंधी पाठपुरावा देखील सुरू आहे. कृष्ण तलावाचा भाग हा नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही. हद्दवाढ मंजूर झाल्यास या भागातील नगरपालिकेच्या माध्यमातून विकास करता येईल जेणेकरून पर्यटकांचा ओढा भविष्यात वाढेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. 
- अरुणा माळी, नगराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com