मोहोळ येथे विविध वृक्षांचे वृक्षारोपण

राजकुमार शहा 
रविवार, 8 जुलै 2018

पाटकुल (ता.मोहोळ) येथे ग्रामपंचायत व लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
 

मोहोळ - पाटकुल (ता.मोहोळ) येथे ग्रामपंचायत व लोकमंगल कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संतुलनासाठी सध्या विविध विभागाच्या वतीने वृक्षारोपण मोहिम सुरू आहे. पावसाळा सदृष्य वातावरणामुळे वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. प्रारंभी वृक्षारोपणाचे महत्व समजावे यासाठी गावातुन वृक्षदिंडी काढण्यात आली यात जिल्हा परिषद शाळा व शिवाजी महाविद्यालयातील तीनशे विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वृक्ष लावा आयुष्य वाढवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात चिंच आवळा बेल सिमारोबा इत्यादी वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी  उपसभापती साधना देशमुख सरपंच वर्षा वसे कर उपसरपंच हर्षा वसेकर मुख्याध्यापक नंदकुमार वसेकर, श्री वाघमारे यांच्यासह रुपाली पाटील, शुभदा पाटील, अनिता हेगडकर, अक्षता पवार, जयश्री वाघमारे, प्रातिभा जाधव या कृषीकन्या सह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Web Title: Plantation of various trees in Mohol