सोलापुरात 1768 किलो प्लास्टिक जप्त 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अन्न परवाना विभागाकडून तसेच विशेष पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकून प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शासनाने 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्यावेळीही महापालिकेच्या अन्न परवाना विभागाकडून शहरात विविध ठिकाणी धाडी घालून कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 2 हजार 800 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या.

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत 23 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत 1768 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 148 व्यापाऱ्यांवर कारवाई करून 7 लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच हजार दंड होऊनही पुन्हा प्लास्टिक सापडलेल्या दोघा दुकादारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. 

अन्न परवाना विभागाकडून तसेच विशेष पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकून प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शासनाने 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्यावेळीही महापालिकेच्या अन्न परवाना विभागाकडून शहरात विविध ठिकाणी धाडी घालून कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 2 हजार 800 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. 

महापालिका अन्न व परवाना अधीक्षक ए. के. आराध्ये, निरीक्षक केदार गोटे, श्रीराम कुलकर्णी, केदार गोटे, सूर्यकांत लोखंडे, भारत रोडगे व दत्ता गायकवाड यांच्या पथकाने काल विशेष कारवाई करीत दोन व्यापाऱ्यांकडून प्लास्टिकचे ग्लास जप्त केले. अंबिका प्लास्टिकचे रमेश नल्ला आणि यादगिरी बुधाराम या दोन व्यापाऱ्यांना यापूर्वी पाच हजार रुपये दंड झाला होता. पुन्हा त्यांच्याकडे प्लास्टिक सापडले. त्यामध्ये 4200 नग प्लास्टिकचे ग्लास, 10 हजार नग प्लास्टिक पिशव्या, दुसऱ्या दुकानात नऊ हजार नग प्लास्टिक पिशव्या, 100 किलो नॉन ओव्हन बॅग, एक पोत स्ट्रॉचा समावेश आहे. या मालाची किंमत सुमारे सुमारे 57 हजार रुपये आहे. या दोघांकडे आता पुन्हा प्लास्टिक आढळले तर प्रत्येकी 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावासाची शिक्षा होण्याची शक्‍यता आहे.

कालावधी : २३ जुन ते १८ ऑगस्ट
दुकाने तपासली : २६२५
दंड झालेले व्यापारी : १४८
वसूल दंड : ७.५ लाख 
जप्त प्लास्टिक : १७६८ किलो

Web Title: plastic seized in Solapur