अक्कलकोटमध्ये 'वऱ्हाड निघालं लंडनला'

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 20 जुलै 2018

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे तिसरे पुष्प संदीप पाठक यांच्या वऱ्हाड निघालय लंडनला या कार्यक्रमाने गुंफले.आजच्या या तिसऱ्या पुष्पात
हजारो भक्त जनाना हास्यकल्लोळाची सैर अन्नछञ मंडळाने घडविली.

कार्यक्रमाला स्वामी भक्त व नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.प्रारंभी कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी महिला काॅग्रेस प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ डाॅ. आसावरी पेडगांवकर, मिनल शहा, जेष्ठ पत्रकार प्रशांत बडवे, विनायक होटकर, यांच्या हस्ते समर्थ प्रतिमा पूजन आणि नंदादीप प्रज्वलित करून करण्याला. मान्यवरांचा सत्कार अन्नछञ कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

संदीप पाठक यांनी वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकात अनेक पात्र हसत खेळत रंगवली. उपस्थित श्रोते हास्यधारात चिंबचिंब झाले. या वेळी अन्नछत्र अध्यक्ष जन्मेजय भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अॅड. संतोष खोबरे, अन्नछत्र विश्वस्त अलका भोसले, अनुया फुगे, अर्पिता भोसले, दर्शना लेंगडे, अनिता खोबरे, मिनाक्षी सोमवंशी, प्रा.स्नेहल पाठक, अनुराधा पेडगांवकर, सुनीता कुलकर्णी, उषा हंचाटे, लता कुलकर्णी, सुरेश सुर्यवंशी, अॅड हर्षवर्धन एखंडे, दत्तात्रय पाटील, निखिल पाटील, प्रशांत साठे, संतोष भोसले, आप्पा हंचाटे यांच्यासह भक्तजन मोठ्या संखेने उपस्थित होते.सूत्रसंचलन श्वेता मालप यांनी केले.

Web Title: a play varhad nighal london la is at akkalkot