पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 19 जानेवारी 2019

पंतप्रधानरुपी राजा उदार झाला पण हाती भोपळा हाती आला असा अनुभव सोलापूरकराना आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतून एक पैसाही खर्च करु नये.
- चेतन नरोटे, गटनेता कॉंग्रेस

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही संबंध नसतानाही महापालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

पंतप्रधानानी उद्घाटन व लोकार्पण केलेल्या स्मार्ट सिटी, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण आणि रे नगर या संस्थावर मात्र एक रुपयाचाही बोजा पडला नाही. संपूर्ण यंत्रणाही महापालिकेचीच राबविण्यात आली होती. रस्ते करणे २० लाख रुपये, पॅच वर्क करणे ६ लाख, पार्क स्टेडियम रंगवणे ६ लाख, मैदानावरील व्यवस्था ४६ लाख ही काही प्रमुख खर्चाचे आकडे आहेत. याशिवाय किरकोळ कामासाठीही हजारो रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे.

एकीकडे परिवहनचे हक्काचे पैसे देण्यात अडचण असल्याचे कारण देणाऱ्या महापालिका प्रशासनाकडे संबंध नसलेल्या कामासाठी लाखो रुपये कसे उपलब्ध होतात असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. 

पंतप्रधानरुपी राजा उदार झाला पण हाती भोपळा हाती आला असा अनुभव सोलापूरकराना आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतून एक पैसाही खर्च करु नये.
- चेतन नरोटे, गटनेता कॉंग्रेस

विकासकामाला पैसे नाहीत म्हणणारे प्रशासन हे लाखो रुपये कसे देते हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान दौऱ्यासाठी अनुदान का आले नाही?
- आनंद चंदनशिवे गटनेता बसपा

महापालिकेचा काहीच थेट संबंध नसलेल्या दौऱ्यासाठी सोलापूरकरांच्या खिशाला चाट लाऊ नये. अनुदानासाठी प्रयत्न करावेत.
- किसन जाधव गटनेता राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: PM Narendra Modi Solapur visit