Repeal Farm Laws : शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Repeal Farm Laws : शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय

Repeal Farm Laws : शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय

निपाणी : केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले. तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा शेतकऱ्यांच्या लढावू वृत्तीचा विजय असल्याचे मत चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १९) शेतकऱ्यांविरोधातील तीन कायदे मागे घेतले आहेत. त्यानिमित्त चिक्कोडी जिल्हा संघटनेतर्फे येथील धर्मवीर संभाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. त्या प्रसंगी पोवार बोलत होते.

हेही वाचा: सोमवारपासून अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये होणार सुरू

राजू पोवार म्हणाले, निवडणूका समोर ठेवून आता मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. पण जे अनन्वित अत्याचार बळीराजावर केले गेले. ज्या पध्दतीने त्यांना देशद्रोही म्हटले गेले. जो खिळे-तारांचा विळखा घातला गेला. जीपच्या टायर खाली चिरडले गेले, हे शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. हा मोदी सरकारच्या अत्याचार, अनाचार व प्रचंड अहंकारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा, धैर्याचा आणि एकजुटीचा विजय आहे. अजूनही १४८ एकर जमीन खरेदीचा कायदा मागे घेतला नाही.

शिवाय शेतकरीआंदोलनात बळी गेलेल्या वारसांना मदत निधी मिळण्यासह उर्वरित शेतकऱ्यांच्या समस्या सुटेपर्यंत संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यासाठी भविष्यात शेतकऱ्यांनी अशाच प्रकारची एकजूट ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: चीनने केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी; अमेरिकेकडेही नाही रोखण्याची क्षमता

निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल यांनी, शेतकरी विरोधामधील काळ्या कायद्यांबाबत विविध शेतकरी संघटनांनी निरंतरपणे आंदोलन केले आहे. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. प्रवीण सूतळे यांनी, तब्बल अकरा महिने आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍यांचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या जनजागृतीमुळे सरकारला नमते घ्यावे लागले आहे. हा सर्वांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. बाळासाहेब हदीकर यांनी, हा शेतकऱ्यांचा नैतिक विजय असल्याचे सांगितले.

यावेळी सुभाष नाईक, नामदेव साळुंखे, इस्माईल मुल्ला, इरफान मुल्ला, महादेव शेळके, एजाज मुल्ला, यासीन मुल्ला, दिलीप कांबळे, युवराज केस्ती, साहिल कांबळे, पांडुरंग कोळी, बाळकृष्ण पाटील, काशीम मुल्ला, महेश पाटील, तानाजी पाटील, सुनील गाडीवड्डर, बाळासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top