उचगावात पत्नीवर विषप्रयोग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

कोल्हापूर - पतीने चहामधून विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक जबाब उचगाव (ता. करवीर) येथील पत्नीने "सीपीआर'मध्ये पोलिसांना दिला. तशी पोलिस यंत्रणा खडबडून गेली. डॉक्‍टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, याच महिलेने रात्री मी स्वतःच विष प्याल्याचे सांगितल्याने पोलिसच संभ्रमात पडले. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. 

उचगाव (ता. करवीर) येथील विवाहिता मॉलमध्ये खासगी नोकरी करते. पती "एमआयडीसी'त नोकरी करतो. त्यांना मुलगी आहे. पती संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार खटके उडतात. मुलीला कोण सांभाळणार, यावरून त्यांच्यात वाद होत असल्याने दोघेही विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोचले होते. आज सकाळी विवाहिता नोकरीला जाण्याची तयारी करीत होती. पतीने तिला चहा करून दिला. तो प्याल्यानंतर तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. तिची प्रकृती बिघडली. तिने वडिलांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी तिला उपचारांसाठी "सीपीआर'मध्ये दाखल केले. उपचारांदरम्यान तिने पोलिसांना पतीनेच चहातून विष पाजून मला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तशी पोलिस यंत्रणा खडबडून गेली. पोलिस अधिकाऱ्यांनी "सीपीआर'ला भेट दिली. तहसीलदारांसमोर तसा त्या महिलेने जबाब दिला. मात्र, रात्री हीच महिला मी स्वतः विष प्याल्याचे पोलिसांना सांगू लागली. मला माझ्या कुटुंबाबरोबर राहायचे आहे, असे म्हणू लागली. त्यामुळे पोलिसांच्या संभ्रमात भर पडली. रात्री उशिरा त्या महिलेचा जबाब नोंदविण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते. 

Web Title: Poisoning on wife in kolhapur