पोळ्याच्या बैलांच्या पाठीवरही उमटल्या बळीराजाच्या वेदना

pola
pola

वाल्हे -  पोळा सण साजरा करताना त्यावर दुष्काळाचे सावट होते. तरी बळीराजाने सर्जा-राजाचा पोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. बैलांची सजावट करताना बैलांच्या पाठीवर 'मुख्यमंत्री साहेब शेतीमाला हमीभाव द्या', 'इंधन दरवाढ', 'शेतकरी आत्महत्या' अशा लक्षवेधी सुचनांनी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व वेदना व्यक्त केल्या.

आज सोमवार(दि.8) सोमवती आमावस्या भादवी पोळ्यानिमित्त वर्षभऱ शेतात राबणाऱ्या सर्जा-राजा सजवुन ग्रामीण भागाबरोबरच शहरातही बैलजोडांची ठिकठिकाणी ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणुक काढुन सण साजरा करण्यात आला. कायमस्वरूपी शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बौलजोडीसाठी पोळा हा एकमेव सण साजरा केला जातो. सकाळपासुनच 
ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोळ्याची तयारी सुरू केली होती. बैलांना अंघोळ घालुन मोठ्या उत्साहात बैलजोड्या रंगविण्यात आल्या होत्या. तदनंतर मिरवणुका काढुन सण साजरा करण्यात आला.

राख (ता.पुरंदर) येथील निलेश जयसिंग निगडे या तरूण शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ओढे-नाले कोरडे असल्याने घरीच बैलांना अंघोळ घातली. नंतर शिंगावर घुंगराच्या पितळी छमक्या, गळ्यात गेजा, पितळी घंडी बांधली. आपल्या सोन्या व लक्ष्या या लाडक्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटुन बैलांना सजविले.त्यात मुख्यमंत्री साहेब शेतीला हमीभाव द्या, इंधन दरवाढ, रोजगार वाढवा, शेतकऱ्यांना लक्ष द्या आत्महत्या थांबवा, अशा विविध संदेशाद्वारे बळीराजाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर 'वरूणराजा माझ्या धन्याला वाचव' असा संदेश देत पावसासाठी देवालाही साकडे घातले. पोळ्यानिमित्त या तरूणाने बैलांची केलेली आगळीवेगळी सजावटव बौलांच्या पाठीवर लिहिलेला संदेश गावात लक्षवेधी ठरला. गावांतर्गत बैलांच्या मिरवणुकीनंतर त्यांना गोड पुरणपोळीचा घास भरवित आपली कृतज्ञता व्यक्त करुन पोळा सण साजरा करण्यात आला.

याबाबत बोलताना निलेश निगडे म्हणाले कि, शेतातील पेरणी, मशागतीच्या कामांसह मालवाहतुकीसाठी बैलांची मदत यांत्रिक युगातही घेतली जात आहे. परंतु, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पिकांना हमीभाव मिळत नाही, इंधनाचे वाढते दर त्यातच नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हैराण झाला आहे.दुष्काळजन्य परिस्थितीत बैलांचा सांभाळ करणे डोईजड जात आहे. 

म्हणुन आज पोळ्याच्या निमित्ताने बैलांवर विविध संदेशाद्वारे बळीराजाला सावरण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी जयसिंग निगडे, नकुसा निगडे, विनायक पवार उपस्थित होते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com