डल्ला मारणाऱ्या पोलिसांनी मारली कामाला दांडी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सांगली - तपासाच्या नावाखाली वारणानगर येथे 9 कोटी 18 लाखांच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन अधिकाऱ्यासह 5 पोलिस कर्मचारी "आऊट ऑफ कव्हरेज' आहेत.

रविवारपासून त्यांनी कामाला दांडी मारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सात जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आज सर्वच ठिकाणी या प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू होती.

सांगली - तपासाच्या नावाखाली वारणानगर येथे 9 कोटी 18 लाखांच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन अधिकाऱ्यासह 5 पोलिस कर्मचारी "आऊट ऑफ कव्हरेज' आहेत.

रविवारपासून त्यांनी कामाला दांडी मारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सात जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आज सर्वच ठिकाणी या प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू होती.

मिरजेतील बेथेलहेमनगरमधील मोहिद्दीन अबुबकर मुल्ला हा सांगलीतील एका क्रेन सर्व्हिसमध्ये कामाला होता. त्याने नवी कोरी बुलेट घेतल्याने तो नजरेत आला होता. मिरजेतील दोन पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दोन बुलेट सोडवून घेतल्या. आणखी काही पोलिसांनी मोहिद्दीनसमवेत पार्टी झोडल्याचीही चर्चा रंगली होती. एलसीबीच्या खबऱ्यांमार्फत ही माहिती पोलिस कर्मचारी दीपक पाटील यांना मिळाली. त्यानंतर तत्कालीन निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांच्या पथकाने 12 मार्च 2016 रोजी बेथेलहेमनगरला मोहिद्दीनच्या घरावर छापा घातला. त्यामध्ये तीन कोटींहून अधिक रक्कम जप्त केली. नंतर कोडोली पोलिसांनी एक कोटीहून अधिक रक्‍कम जप्त केल्याचे कारवाईतून पुढे आले.

सांगली आणि कोडोली पोलिसांच्या कारवाईदरम्यान 13 मार्च 2016 ला सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवेसह सहा जणांनी वारणानगर शिक्षक कॉलनीतून सहा कोटीवर डल्ला मारला; तर 15 मार्च 2016 रोजी पुन्हा निरीक्षक घनवट, चंदनशिवेसह पाच जणांनी तीन कोटी 18 लाखांवर डल्ला मारल्याबद्दल गुन्हा नोंदवला गेला. काल याची माहिती सर्वत्र पसरली.

गुन्हा दाखल झालेले निरीक्षक घनवट, कर्मचारी शरद कुरळपकर सध्या गुंडाविरोधी पथकाकडे नेमणुकीस आहेत. सहायक निरीक्षक चंदनशिवे, कर्मचारी दीपक पाटील, रवींद्र पाटील एलसीबीत आहेत. शंकर पाटील बीडीडीएस पथकाकडे तर कुलदीप कांबळे मिरज शहरला नेमणुकीस आहेत. त्यापैकी काही जण काल सकाळी दिसले. त्यानंतर दुपारपासून सर्वांनीच दांडी मारली आहे. घनवट रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

'डिटेक्‍शन' करणारे मोजकेच
एलसीबीमध्ये दहा ते पंधरा वर्षे ठाण मांडून बसलेल्यांपैकी अपवाद वगळता इतरांनी आत्तापर्यंत किरकोळ कामगिरी बजावली आहे; परंतु गेल्या तीन-चार वर्षात आलेल्या तरुण पोलिसांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांना रिवॉर्ड देताना इतरांचीही नावे त्यामध्ये घुसडून कामगिरी दाखवली गेली. ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने "एलसीबी'चे काम जिवंत ठेवले आहे. कलेक्‍शन नव्हे तर "डिटेक्‍शन' करणाऱ्यांना संधी देण्याची गरज आहे.

गुन्हा दाखल झालेले अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्याबाबत कोल्हापूर पोलिसांकडून अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. कारवाईचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच खातेनिहाय चौकशीही सुरू होईल.
- दत्तात्रय शिंदे, सांगली पोलिस अधीक्षक

Web Title: police absent on duty