पतीच्या मदतीने आंटीने चालविला कुंटणखाना!

पतीच्या मदतीने आंटीने चालविला कुंटणखाना!

सोलापूर : जुना विजापूर नाका परिसरातील माजी सैनिकनगर येथे चालू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक पीडित महिलेसह कुंटणखाना चालवणारी आंटी, तिचा पती आणि मदत करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती, तरीसुद्धा आंटीने पतीच्या मदतीने पुन्हा कुंटणखाना सुरू केला होता. 

हेही वाचा : पाणी प्रश्‍नासाठी सोलापूरहून मुंबईला जाणार चालत 

कुंटणखाना चालवणारी आंटी
माजी सैनिकनगर परिसरामध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकास मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पथकाने गुरुवारी कारवाई केली. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली तर कुंटणखाना चालवणारी आंटी रशिदा समदअली लष्कर व तिला मदत करणारा पती महोम्मद तालिब म.अस्लम अन्सारी (वय 23, रा. जि. बिजनोर, निजीबाबाद, उत्तर प्रदेश, सध्या- माजी सैनिकनगर, विजयपूर रोड, सोलापूर) आणि मदत करणारा तुषार शिवशरण बनसोडे (वय 23, रा. झोपडपट्टी नंबर एक, विजापूर नाका, सोलापूर) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : माजी आमदाराकडून संचालकाला जीवे मारण्याची धमकी 

जामिनावर सुटल्यावर परत हा धंदा सुरू केला
एक ते दीड वर्षापूर्वी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आंटी रशिदा लष्कर हिच्यावर कुंटणखाना चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जामिनावर सुटल्यावर तिने परत हा धंदा सुरू केला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिरीष शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळ, महिला पोलिस हवालदार सुवर्णा काळे, महिला पोलिस नाईक अर्चना गवळी, ज्योती मोरे, मुजावर, महिला पोलिस शिपाई मंडलिक, भुजबळ, खरात यांच्या पथकाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com