esakal | दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड 
sakal

बोलून बातमी शोधा

Police arrest gang for robbery

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने काल (बुधवारी) सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त केले.

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. 


राजेश बबन देशमुख (रा. राहुरी), कंवर रहीम मिर्झा (रा. श्रीरामपूर), जाफर मुक्तार शेख (श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ जग्ग्या युनूस खान (श्रीरामपूर) व अनिल रावसाहेब चव्हाण (राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. 

सावेडी, बोल्हेगाव उपनगरात काही दिवसांपासून घरफोडी व रस्तालुटीच्या घटना वाढल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना कॉटेज कॉर्नरकडून मोटारीतून काही लोक दरोड्याच्या उद्देशाने हत्यारासह भिस्तबाग महालाकडे येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने भिस्तबाग महालाजवळ सापळा रचला. बुधवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी हात दाखवून मोटार थांबविली.

पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारीसह सत्तूर, चाकू, लाकडी दांडके, असा एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कंवर रहीम मिर्झा, जाकीर ऊर्फ जग्या युसूफ खान, जफर मुख्तार शेख यांच्याविरुद्ध पुणे, नाशिक, धुळे, दिल्ली, गुजरात राज्यात विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. 


पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिरीष देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, पोलिस नाईक सुरेश माळी, रणजित जाधव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली. 

loading image