माजी आमदार शंकरराव गडाख पोलीसांच्या ताब्यात

माजी आमदार शंकरराव गडाख पोलीसांच्या ताब्यात

नेवासे - मराठवाड्याला पाणी सोडू नये तसेच नेवासे तालुक्यातील केटीवेअर, बंधारे भरून द्यावे व उन्हाळ्यात दोन रोटेशन मिळावे या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख हे सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसह मुळा धरणावर जेथून नदीत पाणी सोडले जाते त्याठिकाणी धरणे धरून बसले आहे. मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही हजारो शेतकरी गडाखांच्या नेतृत्वाखाली बारागाव नांदूर मार्गे धरणाच्या पायथ्याशी पोहचले. त्यांनी पाण्यातच ठिय्या मांडून शासनाच्या जायकवादी धरणात पानी सोडण्याच्या निर्णयाचा घोषणा देत निषेध केला. यावेळीयांडोलक व पोलिस सामोरा समोर आल्याने काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रात्री आठ वाजता पोलीसांनी गडाखांना ताब्यात घेतले. यामुळे नेवासे तालुक्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांकडून आमदार बाळासाहेब मुरकुटे व पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात येत आहे.   

माजी आमदार शंकरराव गडाख यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सोनई (ता. नेवासे) येथे नेवासे तालुक्यातील शेतकर्‍यांचा मेळावा बोलाविला त्यात त्यांनी मुळा, भंडारदरा धरणाची आकडेवारी व जायकवाडीतील पाण्याचा कसा अपव्यय झाला हे सांगून शेतकऱ्यांना ही लढाई नेटाने लढावी लागेल, मराठवाड्याला पाणी जाऊ नये याचा विरोध करण्यासाठी त्यांनी भूमिका मांडतांना पाणी जाणार आहे तेथे आपण जाऊन धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले. उपस्थित शेतकर्‍यांनी त्यांना घोषणा देत प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे तालुक्यातील सुमारे दोन हजार शेतकरी सोनई येथून मुळा धरनावर पोहचले. यावेळी पोलिसांनी गडाखांना अडवले. यावेळी गडाखांच्या समवेत कॉम्रेड बाबा अरगाडे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

शंकरराव गडाख म्हणाले, "मुळा धरणाचे एक थेंब पाणी जायकवाडीला जावू देणार नाही. निवडणूका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या राजकारणासाठी नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुळा धारणाखालील नेवासा तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान होणार असल्याची भीती गडाख यांनी व्यक्त केली. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याच्या भरवश्यावर तालुक्यातील शेतकरी कर्ज काढून पिके घेतात. या निर्णयामुळे ही पिके हातची जाण्याचा धोका असून त्याची नुकसान भरपाई शासन देणार का? मराठवाड्यातील लोकांच्या मनाने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या निर्णयास तितकासा प्रखर विरोध नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठवाड्यातील राजकारणासाठी आपल्या शेतकऱ्यांचा बळी देणार का असा प्रश्न त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना विचारला. या निमित्ताने आपली अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे. या प्रश्नी आंदोलनाची धार व तीव्रता वाढवावी लागणार आहे.

यंदाचा दुष्काळ फार भयानक असल्याचे वास्तव स्पष्ट करून मूळा धरणाच्या तेवीस टीएमसी पाणी साठ्यापैकी खर्च झालेल्या पाच टीएमसी पाण्याचे नियोजन लोकप्रतिनिधीनी व्यवस्थित केले असते तर आजची परिस्थिती वेगळी दिसली असती. आपण आमदार असतांना मराठवाड्याला सोडायचे पाणी तालुक्यातील केटीवेअर अडवले त्यामुळे तालुक्याला दुष्काळाची झळ पोहचली नाही. तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी या बाबत ठोस भूमिका घेतली असती तर शासनाला हा निर्णय मागे घ्यावाच लागला असता. मात्र लोकप्रतिनिधीनी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती मिळाल्याचे एकीकडे पोकळ वक्तव्य जाहीर करून दुसरीकडे तालुक्यातील सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगत बुद्धिभेद केल्याचा आरोप यावेळी गडाख यांनी केला. या निर्णयामुळे आता नदीकाठची विजजोड तोडण्यात येऊन केटीवेअर बंधाऱ्याच्या फळ्या काढल्या जातील याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

यावेळी गडाखांसह आंदोलक शेतकरी व अनिल दौंडे, पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, राहुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, कैलास देशमाने यांच्यात चर्चा चालू असतांनाच जोरदार पाऊस सुरू झाला. उपस्थित अधिकारी आडोशाला गेले मात्र गडाखांसह आंदोलक भर पावसात पात्रातच उभे होते. दरम्यान रात्री आठ वाजता पोलीसांनी माजी आमदार गडाखांसह आंदोलक शेतकर्‍यांना ताब्यात घेतले. यामुळे नेवाए तालुक्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले असून. हे आंदोलन चिघळण्याचे चिन्हे आहे. 

नेवासे तालुक्यातील केटीवेअर व बंधारे भरणार!
आंदोलनचा रेटा पाहून व गडाख यांची आक्रमकता पाहून नेवासे तालुक्यातील केटीवेअर व बंधारे भरून दिले जातील असे आश्वासन गडाख यांना पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे. याचा मोठा फायदा नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे 

तर जलसमाधी घेईल : शंकारराव गडाख 
माजी आमदार शंकारराव गडाखांसह आंदोलनंकर्ते मुळा धरणावर पोहचले त्यावेटी तेथे पोलिस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संतप्त आंदोलक घोषणा देत धरणावर पोहोचले. यावेळी शेतकरी व आंदोलक समोरासमोर आल्यावर काही काळ येथील वातावरण मात्र संतप्त शेतकरी असतांना त्यावेळेस शंकरराव गडाख यांनी ठोस भूमिका घेतली जर एकाही शेतकऱ्याला काठी लागल्यास मी धरणात जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com