पुण्यातील व्यापाऱ्याचा संशयित खूनी नाना पेठेतील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

संशियत आराेपीने मी व माझे साथीदारांनी चंदन शेवाणी यांचे अपहरण केले हाेते. त्यांना पाडेगाव येथील कॅनॉलवर आणुन धारधार शस्त्राने वार करुन गोळ्या मारुन खून केला असल्याचे सांगितले.
 

सातारा : पुणे येथील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी यांना दोन कोटी रुपये खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. लोणंद (ता. खंडाळा) येथील शास्त्री चौकातील मोमीन बिल्डिंगमध्ये लावलेल्या सापळ्यात तो जेरबंद झाला.

हेही वाचा - कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंतबुवा पिसाळ यांचा खून 

आफ्रिदी रौफ शेख (वय 23, रा. नाना पेठ, पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्यापारी शेवाणी यांचे अपहरण करून शनिवारी पाडेगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे 
धारधार हत्याराने वार करुन, तीन गोळ्या मारुन खून केला होता. तसेच पुरावा नष्ठ केले होते.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांना तपासाबाबत सूचना केल्या होता. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, आनंदसिंग साबळे हे तपास करीत असताना या गुन्ह्यातील संशयित आफ्रिदी शेख हा लोणंद येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.

लोणंद येथील शास्त्री चौकातील मोमीन बिल्डींग परिसरात पोलिसांनी सापळा रचला. काल रात्री दहा सुमारास तो संशयितरित्या मोमीन बिल्डींग समोर फिरत असताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा -  Video : पाडेगावमध्‍ये खून; मृत पुण्‍यातील व्‍यापारी?
 
पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने मी व माझे साथीदारांनी चंदन शेवाणी याचे अपहरण करुन त्यांना पाडेगाव येथील कॅनॉलवर आणुन धारधार शस्त्राने वार करुन गोळ्या मारुन खून केला असल्याचे सांगितले.

संशयितास बंडगार्डन (पुणे) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई डॉ. सागर वाघ, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, फौजदार विलास नागे, पृथ्वीराज घोरपडे, नाईक संतोष जाधव, प्रविण कडव, योगेश पोळ, पंकज बेसके, शिपाई गणेश कापरे, धीरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीण, अनिकेत जाधव यांनी केली. त्याचे दोन साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - पुण्यातील व्यवसायिकाचे 2 कोटीसाठी अपहरण; साताऱ्यात गोळी घालून खून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Suspected Killer Of Pune Businessmen Satara News