दोन हजारांची लाच घेताना 2 पोलिस अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

आज सकाळपासुनच लाचलुचपत विभागाने पाटण पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळी रचला होता. पोलिस ठाण्यात लाच स्विकारल्यानंतर त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांच्या विरोधात पाटण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.

पाटण (सातारा) : पाटण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चाफ्टर केसमध्ये मदत करण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पाटण पोलिस ठाण्यातील दोन पोलिस रंगेहाथ सापडले. पोलिस ठाण्यातच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस हवालदार संजय बाळकृष्ण राक्षे व पोलिस नाईक कुलदीप बबन कोळी अशी कारवाईत सापडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

याबाबत लाचलुचपत विभागाकडुन मिळालेली माहिती अशी की, संबंधीत तक्रारदारावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व संबंधीत तक्रार लाचलुचपत कार्यालय सातारा येथे न पाठविण्याबाबत कुलदीप कोळी व संजय राक्षे यांनी तक्रारदारास चार हजाराची लाच मागितली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे मान्य करुन तक्रारदाराने शुक्रवारी ( ता. १८) लाचलुचपत कार्यालय सातारा येथे याबाबत तक्रार दाखल केली होती.

आज सकाळपासुनच लाचलुचपत विभागाने पाटण पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळी रचला होता. पोलिस ठाण्यात लाच स्विकारल्यानंतर त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांच्या विरोधात पाटण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.

सदरची सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणेचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, साताराचे पोलिस उप अधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आरिफा मुल्ला, सहाय्यक फोजदार आनंदराव सपकाळ, पोलिस हवालदार भरत शिंदे, संभाजी बनसोडे, पोलिस काँन्स्टेबल विनोद राजे व संभाजी काटकर यांनी केली.

Web Title: police arrested for taking bribe in Karhad