कमालच आहे ! लाॅकडाऊन काळात चाेरी

कमालच आहे ! लाॅकडाऊन काळात चाेरी
Updated on: 

वहागाव (जि.सातारा) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तासवडे (ता. कऱ्हाड) येथील एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या, दुकाने व हाॅटेल बंद असल्याचे पाहून येथील एक हाॅटेल फोडून त्यातील साहित्यासह रोख रक्कमेची चोरी करणाऱ्या संशयित चोरट्यांना तळबीड पोलिसांनी अवघ्या पंधरा मिनिटांत शिताफीने पकडून दुचाकीसह अटक केली. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

शुभम रामचंद्र कोकरे (वय-२३) व ओंकार जालिंदर देशमुख (वय-२०, रा. बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड) अशी याप्रकरणी तळबीड पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तासवडे एमआयडीसीत रस्त्याच्या कडेला हाॅटेल साई वडापाव नावाचे पत्रा वजा शेडचे हाॅटेल आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच हाॅटेल व कंपन्या बंद असल्याने हे एमआयडीसीतील हाॅटेल ही बंद होते. दरम्यान संशयित आरोपी शुभम व ओंकार याने शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास या हाॅटेल परिसरात येऊन टपरीचा पत्रा उचकटून हाॅटेलमध्ये प्रवेश केला. आणि टपरीतील रोख रक्कम दोन हजार रुपये, तसेच ५०० रुपये किंमतीची गॅसची मोकळी टाकी, २२० रुपये किंमतीचे बिस्कीट पुडे व इतर साहित्य असा एकूण दोन हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते पोबारा करण्याच्या तयारीत होते.

दरम्यान नजीकच्या ग्रामस्थांना हाॅटेल मधील संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ तळबीड पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच अवघ्या पंधरा मिनिटांत तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी शशीकांत खाडे, सी. पी. पाटील हे घटनास्थळी पोहोचले. व त्यांनी संशयीत हे चोरीच्या प्रयत्नात असतानाच त्यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

होम क्वारंटाइन होऊन कंटाळा आलाय? तुम्हाला आहे बक्षीस जिंकण्याची संधी

पोलिसांनी संशयितांना दुचाकीसह ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी आज (शनिवार) संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत हाॅटेल व्यावसायिक श्रीमती राजश्री देशमुख (रा. नडशी) यांनी तळबीड पोलिसांत तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शहाजी पाटील या घटनेचाअधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी प्रसंगावधान राखून केलेल्या कारवाईबद्दल तळबीड पोलिसांचे विविध ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. 

Coronavirus : त्यांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आल्याने सातारकरांसह कऱ्हाडकरांना दिलासा 

दरम्यान, याबाबत जयश्री पाटील 'सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हाॅटेल, एमआयडीसीतील विविध कंपन्या, दुकाने बंद असल्याने ग्रामस्थांनी परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवावी. पोलिसांचेही अशा घटनांवर बारीक लक्ष आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Koyna Dam water reuse project Maharashtra
Shiv Sena UBT leaders Belagavi entry ban November 1 2026
Harshada Deshmukh-Jadhav election victory