बेळगावात कोरोनाबाबत वाहतूक पोलिसांची नवी शक्कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

बेळगावात कोरोनाबाबत वाहतूक पोलिसांची नवी शक्कल

बेळगाव : वाहतूक नियम आणि कोरोनाबाबत (Covid -19) वाहतूक पोलिसांकडून आता जागृती केली जात आहे. शहरातील सिग्नलवर (Signals) थांबून लाऊडस्पीकरद्वारे पोलिस नागरिकांना सूचना करत आहेत. जिल्ह्यात (Belgaum district) दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दररोज रात्री १० नंतर नाईट कर्फ्यु (Night Curfew) आणि शनिवार-रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यु (Weekend Curfew) लागू करण्यात आला आहे.

परजिल्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे दोन डोस आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे सक्तीचे करण्यात आले आहे. अहवाल नसलेल्यांना तपासणी नाक्यावरून परत पाठवण्यात येत आहे. तसेच कोरोना नियमावलीचे पालन करण्याबाबत सातत्याने सूचना करण्यात येत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांकडून नियमावलीचे पालन केलेल दिसून येत नाही.

हेही वाचा: छगन भुजबळ अडचणीत? अंजली दमानियांचं पुन्हा कोर्टात आव्हान

कोरोना संसर्ग वाढत असतानाच वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विना हेल्मेट, नो पार्किंग, विना परवाना वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी यापुढे कटाक्षाने वाहतूक नियमांचे तसेच कोरोना नियमावलीचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांनी जनजागृती हाती घेतली आहे. वाहतूक सिग्नलच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेल्या पोलिसांकडून लाऊडस्पीकरद्वारे सूचना केल्या जात आहेत. जनजागृतीनंतर देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

"कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांना तोंडावर मास्क, सामाजिक अंतर राखले पाहिजे.त्याचबरोबर वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून नागरिकामध्ये जनजागृती केली जात आहे."

- पी. व्ही. स्नेहा, पोलीस उपायुक्त

हेही वाचा: उन्नाव पीडितेच्या आईला तिकीट, काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top