फिल्मीस्टाईल थरार ; बंगळूरात चकमकीत कुख्यात गुंडाचा खात्मा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

कुख्यात गुंड स्लम भरत याचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्याचा खात्मा केला. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केल्यावर झालेल्या चकमकीत जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

बंगळूर  : कुख्यात गुंड स्लम भरत याचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्याचा खात्मा केला. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केल्यावर झालेल्या चकमकीत जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

हे पण वाचा - पगार न दिल्याने उद्योजकावर गोळी झाडल्याचे स्पष्ट 

बंगळूर उत्तर विभागातील पोलिस त्याला चौकशीसाठी गुरुवारी पहाटे घेऊन जात असताना त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला करुन त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस निरीक्षक व्यंकटरामनप्पा यांनी भरतवर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात पोलिस निरीक्षकावर हल्ला

स्लम भरत हा खून, खून करण्याचा प्रयत्न, खंडणी आणि प्राणघातक हल्ला अशा अनेक गुन्ह्यातील तो आरोपी होता. दोन दिवसांपूर्वी बंगळूर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली होती. मंगळवारी त्याला बंगळुरात आणण्यात आले. स्लम भरतने 30 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीप्रसंगी बनशंकरी पोलिसांनी रात्री साडे अकरा वाजता छापा टाकला होता. यावेळी भरत आणि साथीदारांनी धूम ठोकली होती. यानंतर यांचा उत्तर प्रदेशात शोध घेऊन त्याला मंगळवारी अटक केली. यानंतर त्याला पोलिस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी होऊन उपचारवेळी त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना गोळी लागली मात्र बुलेट प्रूफ जॅकेट असल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यानंतर हेसराघाट्टा रोडवर कारचा पाठलाग करुन भरतला शरण जाण्यास सांगितले, मात्र त्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर त्यात तो जखमी झाला, त्यानंतर रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्यात पोलीस हवालदार सुभाषही जखमी झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police criminal encounter in bangalore