esakal | Video : पोलिसांच्या एका हाकेत हजारो महिला पडल्या घराबाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पोलिसांच्या एका हाकेत हजारो महिला पडल्या घराबाहेर

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी महिलांना निर्भयपणे स्वतः संकटाशी सामना करण्याची शपथ दिली. समस्त महिलांनाही आपण अबला नाही तर, सबलाच असून वेळ आल्यास दाखवून देऊ , अशी गर्जना केली.

Video : पोलिसांच्या एका हाकेत हजारो महिला पडल्या घराबाहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः आम्ही अबला नाही सबलाच आहोत, हे दाखवून देऊ आणि पिडीत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू, अशी शपथ पेटत्या कॅंडल आणि गांधी मैदानाच्या साक्षीने घेत हजारो महिलांनी जिल्हा पोलीसांच्या निर्भया पथकाच्या वतीने आयोजिलेल्या वॉकथॉन (चालणे) उपक्रमात महिलाशक्तीचे दर्शन घडविले.
 
अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची ताकद महिलांत निर्माण व्हावी, त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी शनिवारी (ता.15) रात्री अकरा वाजता निर्भया पथकाच्या वतीने वॉकथॉन (चालणे) उपक्रम आयोजिला होता. त्यास महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. देशामध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. तरीही अनेक महिला अजूनही धाडसाने पुढे येऊन सक्षमपणे संकटाचा सामना करताना दिसत नाहीत. प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिला, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र, एखादे मोठे संकट येताच कोणाचा तरी आधार शोधण्याचा प्रयत्न करतात. योग्य आधार व मदत न मिळाल्याने त्यांना संकटाला सामोरे जावे लागते. या महिला सक्षम व्हाव्यात, त्यांनी संकटाचा सामना निर्भयपणे स्वतः करावा, तेवढा आत्मविश्‍वास त्यांच्यात यावा हा या उपक्रमाचा उद्देश होता.

हेही वाचा : "ज्ञानश्री' च्या कॅंपस इंटरव्ह्यूमधून विद्यार्थ्यांना नोकरी 

चूल आणि मुल या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन महिलांनी निर्भयपणे रात्रीचे बाहेर पडले पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम काल रात्री 11 वाजता आयोजिला होता. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेकडो महिला रात्री दहापासूनच गांधी मैदानावर हजर झाल्या होत्या. प्रत्येक महिलेने 11 वाजता हातातील मेणबत्या प्रज्वलीत केल्या. त्यावेळी शपथ दिल्यानंतर महिलांनी चालण्यास प्रारंभ केला. त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधिक्षक समीर शेख, उपअधिक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे आणि शाहुपुरी, शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गांधी मैदानावरून कर्मवीर भाऊराव पाटील पथावरून पोलीस मुख्यालयमार्गे या महिला सिटी पोलिस लाईनमधील रस्त्याने नगरपालीका कार्यालयावर गेल्या. तेथून राजपथाने कमानी हौद, मोती चौकातून पुन्हा गांधीमैदानावर गेल्या. त्याठिकाणी या उपक्रमाचा समारोप झाला. 

जरुर वाचा : सातारा : इयत्ता बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर

एसपींनी दिली शपथ 

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी महिलांना निर्भयपणे स्वतः संकटाशी सामना करण्याची शपथ दिली. समस्त महिलांनाही आपण अबला नाही तर, सबलाच असून वेळ आल्यास दाखवून देऊ , अशी गर्जना करत चालण्यास प्रारंभ केला.

 

loading image