सातारा : इयत्ता बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर 

सातारा : इयत्ता बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर 

सातारा ः बारावीच्या परीक्षेसाठी सातारा शहर आणि विविध तालुक्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शाहू ऍकॅडमी, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यासह विविध महाविद्यालयांची बैठक व्यवस्थेची माहिती संबंधित महाविद्यालयातून केंद्रात पाठविण्यात आली आहे. ती पूढील प्रमाणे...
 
धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय 

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या केंद्र क्रमांक 022 मध्ये व उपकेंद्र अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात करण्यात आलेली बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे : 18 फेब्रुवारीस इंग्रजी विषयासाठी या महाविद्यालयात एक्‍स054993 ते एक्‍स054992, एक्‍स151008, एक्‍स151009, एक्‍स151010, एक्‍स151011 आणि कल्याणी विद्यालयात एक्‍स054993 ते एक्‍स054934. मराठी विषयासाठी 20 फेब्रुवारीस डीजी कॉलेजमध्ये एक्‍स054993 ते एक्‍स054992 आणि कल्याणी विद्यालयात एक्‍स055493 ते एक्‍स055890. इतिहास विषयासाठी 29 फेब्रुवारीस डीजी कॉलेजमध्ये एक्‍स055116, एक्‍स 5055262 (इंग्लिश मीडियम) व एक्‍स054993 ते एक्‍स055530 (मराठी मीडियम) आणि कल्याणी विद्यालयात एक्‍स055531 ते एक्‍स055884. भूगोल विषयासाठी सात मार्च रोजी डीजी कॉलेजमध्ये एक्‍स 055116, एक्‍स 055254, 55262, 55317, 5554, 55752 (इंग्लिश मीडियम) व एक्‍स054993 ते एक्‍स055555 (मराठी मीडियम) आणि कल्याणी विद्यालयात एक्‍स055556 ते एक्‍स055916. या व्यतिरिक्त अन्य विषयांची परीक्षा धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात घेण्यात येईल. काही शंका असल्यास व अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा. 

वाचा : आता हे आव्हान आपल्याला पेलायचे आहे : शरद पवार

कला व वाणिज्य महाविद्यालय
 

कला व वाणिज्य महाविद्यालयातील केंद्र क्रमांक 0012 येथे विज्ञान व एमसीव्हीसी विषयाची परीक्षा होईल. मात्र 18, 20 आणि 24 फेब्रुव्रारीचा विज्ञान शाखेची बैठक क्रमांक एक्‍स001219 ते एक्‍स001664 या विद्यार्थ्यांचे पेपर उपकेंद्र असलेल्या अनंत इंग्लिश स्कूल येथे होणार आहेत. 26 फेब्रुवारी व दोन मार्च रोजीचे विज्ञान शाखेचे बैठक क्रमांक एक्‍स001219 ते एक्‍स001319 चे पेपर अनंत इंग्लिश स्कूलमध्ये होतील, तसेच वरील दिनांकाव्यतिरिक्त इतर दिनांकाचे विज्ञान शाखेचे सर्व बैठक क्रमांकाचे सर्व पेपर कला व वाणिज्य महाविद्यालयात होतील, तसेच एमसीव्हीसी शाखेचे सर्व बैठक क्रमांकाचे पेपर कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहेत. काही शंका असल्यास व अधिक माहितीसाठी केंद्र संचालक प्रा. एस. एस. भोईटे, आर. के. चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा. 

हेही वाचा : कॅंपस इंटरव्ह्यूयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी मिळते कौतुकास्पदच
 

छत्रपती शाहू ऍकॅडमी 
छत्रपती शाहू ऍकॅडमी ऍड सायन्स ज्युनियर कॉलेजमध्ये एक्‍स095081 ते एक्‍स095730 या बैठक क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील बारावी परीक्षा केंद्र क्रमांक एक्‍स001858 ते एक्‍स003849 या बैठक क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. याच केंद्राचे उपकेंद्र असलेल्या सेंट पॉल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे एक्‍स003583 ते एक्‍स 003849 या विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेतील इंग्रजी, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयाचे पेपरसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित सर्व विषयांची बैठक व्यवस्था यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे केली आहे. विद्यार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास केंद्र संचालक आर. के. निकम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले आहे. 

कऱ्हाड, पाटणची परीक्षा केंद्रे सज्ज 

कऱ्हाड : शहर, परिसरासह पाटणला उद्यापासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची बैठक व्यवस्था नुकतीच जाहीर झाली. 17 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
 
येथील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात दोन केंद्र असून, त्यातील केंद्र क्रमांक 031 मध्ये सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील शास्त्र व एमसीव्हीसी शाखेचे विद्यार्थी, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील शास्त्र शाखेचे, तसेच सिटी मेडिकल सेंटरमधील एमसीव्हीसी शाखेचे विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देतील. त्यात शास्त्र शाखेसाठी एक्‍स 004030 ते एक्‍स 005565, एमसीव्हीसीसाठी एक्‍स 124507 ते एक्‍स 124631.
 
दुसऱ्या केंद्र क्रमांक 036 मध्ये यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयासह लिगाडे- पाटील ज्युनिअर कॉलेजचे शास्त्र शाखेचे, वेणुताई चव्हाण महाविद्यालयातील एमसीव्हीसी शाखेचे, तसेच शासकीय तांत्रिक विद्यालयातील एमसीव्हीसीचे विद्यार्थी परीक्षा देतील. यामध्ये शास्त्र शाखेसाठी एक्‍स006995 ते एक्‍स 008287, एमसीव्हीसीचे एक्‍स 124632 ते एक्‍स124700 यांची परीक्षा येथे होईल.

वाचा :  व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

मलकापूर : येथील आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी मलकापूर केंद्र क्रमांक 032 आहे. या केंद्रावर एक हजार 109 विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. या केंद्रावर एक्‍स005566 ते एक्‍स006676 या क्रमांकाचे विद्यार्थी केंद्रावर असतील. उद्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एक्‍स006469 ते एक्‍स006676, 24 फेब्रुवारीला भौतिकशास्त्र विषयासाठी एक्‍स006467 ते एक्‍स006675 व 26 फेब्रुवारीला रसायनशास्त्र विषयासाठी एक्‍स006467 ते एक्‍स006672 या विषयांसाठी या क्रमांकांची बैठक व्यवस्था मलकापूर येथील उपकेंद्र प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळेत केली आहे. परीक्षेसंदर्भात समस्या असल्यास केंद्र संचालक एस. वाय. गाडे, उपकेंद्र संचालक एस. डी. पाटील, जे. एन. कराळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांनी केले आहे.
 
पाटण ः येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या केंद्रावर एक हजार 461 विद्यार्थी परीक्षेसाठी बसतील. त्यात कला शाखेचे 535, वाणिज्य शाखेचे 470, विज्ञान शाखेचे 369, तर व्होकेशनल विभागाचे 87 विद्यार्थी परीक्षा देतील. उद्या (मंगळवारी) इंग्रजी व 20 फेब्रुवारीला मराठी विषयांसाठी विद्यार्थी संख्या जास्त असल्याने कला शाखेतील विद्यार्थ्यांची इंग्रजी आणि मराठी विषयाची बैठक व्यवस्था बाळासाहेब देसाई महाविद्यालयात केली आहे. वाणिज्य शाखा व व्यवसाय शिक्षण शाखेतील विद्यार्थ्यांची मराठी आणि इंग्रजी विषयाची बैठक व्यवस्था डीएड, बीएड कॉलेज येथे, तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी व मराठी विषयांची बैठक व्यवस्था माने देशमुख विद्यालय व ज्युनियर कॉलेज पाटण येथे केली आहे. त्यानंतर होणाऱ्या सर्व विषयांचे पेपरसाठीची बैठक व्यवस्था बाळासाहेब देसाई महाविद्यालय येथेच केली आहे, अशी माहिती केंद्र संचालक प्रा. एस. बी. पोवार यांनी दिली. परीक्षा क्रमांकाबाबत शंका असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

बारावी परीक्षेसाठी वडूजला बैठक व्यवस्था 

वडूज : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर बारावी परीक्षेसाठी 775 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रसंचालक प्राचार्य डी. एन. जाधव यांनी दिली. 
मंगळवार (ता. 18 फेब्रुवारी) ते बुधवारअखेर (ता. 11 मार्च) बारावीची परीक्षा होत आहे. या केंद्रावर शिवाजी हायस्कूलसह हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (वडूज), श्री सोमेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (गुरसाळे), महर्षी शिंदे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एनकूळ) अशा पाच विद्यालयांचे बारावीचे एकूण 775 विद्यार्थी परीक्षेसाठी सहभागी होणार आहेत. केंद्रावर परीक्षेची तयारी झाल्याचेही श्री. जाधव यांनी सांगितले. 

गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात सात भरारी पथके 

दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू 

सातारा ः दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून, सर्व केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी दिली.
 
बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षा तीन ते 23 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात बारावीची 49, तर दहावीची 116 परीक्षा केंद्रे नियोजित केली आहेत. जिल्ह्यात 39 हजार 204 विद्यार्थी बारावीची, तर 43 हजार 166 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सर्व दक्षता घेतल्या जाणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे, तसेच या दोन्ही परीक्षांसाठी सात भरारी पथके नेमली जाणार आहेत. परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, तसेच तेथे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना आरोग्याच्या अत्यावश्‍यक सेवा पुरविल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी वेळेवर जाता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना, तसेच परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्याची माहिती श्री. क्षीरसागर यांनी दिली. सातारा सातारा सातारा 


कोरेगावात दोन ठिकाणी बारावीची परीक्षा 

कोरेगाव : येथे मंगळवारपासून (ता. 18) बारावीची परीक्षा सुरू होत असून, त्यासाठीची बैठक व्यवस्था सोमवारी (ता. 17) दुपारी चारला येथील डी. पी. भोसले महाविद्यालयातील मुख्य केंद्रावर व मॉडर्न हायस्कूल येथील उपकेंद्रावर प्रसिद्ध होणार आहे. फक्त वाणिज्य विभागाची इंग्रजी व मराठी या दोन विषयांची परीक्षा अनुक्रमे 18 व 20 तारखेला येथील मॉडर्न हायस्कूल या उपकेंद्रावर होणार आहे. वाणिज्य विभागाच्या उर्वरित सर्व विषयांची, तसेच सायन्स, आर्टस व एमसीव्हीसी या विभागांच्या सर्व विषयांची परीक्षा डी. पी. भोसले महाविद्यालयातील मुख्य केंद्रावर होणार असल्याची माहिती महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

फलटणला चव्हाण हायस्कूलमध्ये बारावी कलाची बैठक व्यवस्था 

फलटण शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी कला शाखेची यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथील बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. 
एच. एस. सी. बोर्ड परीक्षेसाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण केंद्र क्रमांक 0103 या केंद्रावर कला शाखेची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत होत आहे. यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे कला शाखेच्या XO62178 ते XO63045 या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे. या केंद्रात 858 परीक्षार्थींचा समावेश आहे.
 
केंद्रप्रमुख प्राचार्य रवींद्र भोसले म्हणाले,"" विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशपत्रिका (रिसीट) ओळखपत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास आगोदर उपस्थित राहावे. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल आणू नयेत. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com