पोलिस ऑन ड्यूटी २४ तास! सण, उत्सव ठाण्यातच

Police on duty 24 hours on Diwali festival
Police on duty 24 hours on Diwali festival

निपाणी (बेळगाव) : शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी ऑन ड्यूटीच साजरी करावी लागत आहे. कोरोना, गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास ऑनड्यूटी पाहायला मिळत आहेत. 


निपाणी तालुक्यात पोलिस दलातील नव्वद टक्क्यांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ते विनातक्रार जबाबदारी पार पाडत आहेत. समाजातील सर्व घटकांतून दिवाळी हा सण दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. गोडधोड पदार्थापासून खमंग चिवड्याचा स्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. सध्या तर कोरोनामुळे प्रशासनाने बाजारपेठेसह विविध ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तरीही सर्वत्र गर्दीचा महापूर दिसत आहे. तेथेही पोलिसांना काम करावे लागत आहे. मात्र या सणाचा आनंद पोलिसांना घेता येत नाही, हे वास्तव आहे.

हेही वाचा- हाताच्या बोटांची कोड लँग्वेज लय भारी!

महिला पोलिसांची अडचण
दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र  महिला पोलिसांना रजा मिळत नसल्याने वेळ काढून फराळ बनवावा लागतो. शिवाय दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र सुट्टी मिळत नसल्याने प्रसंगी नाराजी ओढवून घ्यावी लागते. भाऊबीजेलाही हीच अडचण निर्माण होते. ही भावना समजून घेणे गरजेचे आहे.


सण, उत्सव, सोहळ्यापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे आहे. परिवारासमवेत दिवाळीसह इतर सण साजरे करावेत, अशी परिवारातील सदस्यांची इच्छा असते. मात्र त्यापेक्षाही कायदा सुव्यवस्था राखणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. नागरिकांच्या आनंदातच आमचे समाधान आहे.'
-शेखर असोदे, पोलिस कॉन्स्टेबल, निपाणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com