काेजागरी दिवशी साताऱ्यात राडा ; पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

crime news of satara
crime news of satara

सातारा : चायनीज गाड्यावर घेतलेल्या खाद्यपदार्थाच्या बिलामध्ये 30 रुपये जादा का लावले, असे विचारल्याच्या कारणावरून तलवार व कोयत्याने हल्ला करून चौघांना जखमी केल्याचा प्रकार वाढे फाटा येथे घडला. या प्रकरणी आठ ते नऊ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
या प्रकरणी पारस जालिंदर बनसोडे (वय 21, रा. बनसोडे मळा, कूपर कॉलनी, रामकुंड) याने फिर्याद दिली आहे. काल (ता. 13) रात्री नऊच्या सुमारास पारस हा शंतून शिंदे (रा. गुरुवार पेठ) व हणमंत भोसले (रा. श्रीनाथ कॉलनी, रामकुंड) या मित्रांसोबत वाढे फाटा येथील श्रीकृष्ण चायनीज येथे गेले होते. तेथे त्यांनी 120 रुपयाला एक अशा फुल लॉलीपॉपच्या दोन प्लेट पार्सलची ऑर्डर दिली. या वेळी चायनीज गाड्यावर तयार केलेला राईस शिल्लक होता. त्याचे किती पैसे होतील, असे त्यांनी विचारले. त्या वेळी तेथील मुलाने 30 रुपये सांगितले. त्यानंतर तिघांनी तो राईस तेथे बसून खाल्ला.

लॉलीपॉपची ऑर्डर झाल्यावर त्यांनी बिलाबाबत विचारणा केली. त्या वेळी त्यांना 300 रुपये सांगण्यात आले. बिलामध्ये 30 रुपये जास्त असल्याचे त्यांनी संबंधित मुलाला सांगितले. त्याचवेळी तेथील स्विट मार्टच्या दुकानातील काउंटरवर बसलेल्या मुलाने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरवात केली. फोन करून कोणाला तरी तेथे येण्यासही त्याने सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी दोन कारमधून चार ते पाच मुले आली. त्यांनी गाडीतून उतरून पारसला मारहाण केली. शंतनू व हणमंत तेथून पळून गेले. जाताना पारसने शंतनूला प्रतीकदादाला फोन कर असे सांगितले होते. मारहाण केल्यानंतर गाडीतून आलेली मुले निघून गेली.

त्यानंतर प्रतीकदादा, तेजस शिर्के, प्रथमेश कुलकर्णी, शंतनू व हणमंतही तेथे आले. काउंटरवरील मुलाला काय झाले, असे प्रतीकदादा विचारत असताना त्याने पुन्हा फोन केला. त्यानंतर दोन्ही गाड्यांतून पुन्हा सात-आठ लोक तेथे आले. त्यांनी गाडीतून उतरून सर्वांना दांडक्‍याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यातील पांढरे कपडे घातलेल्या एकाने तलवार व कोयते आणण्यास सांगितले. गाडीतून हत्यारे आणून सर्वांवर सपासप वार केले. त्यात पारसच्या पाठीवर दोन, तेजस शिर्के याच्या पाठीवर तीन, प्रतीकदादाच्या डोक्‍यात दोन तसेच प्रथमेश कुलकर्णीच्या पोटावर व बरगडीच्या खाली वार झाले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com