Satara Crime: वाठार पोलिसांकडून १४ मोबाईल हस्तगत; २ लाख ३० हजाराचे माेबाईल मूळ मालकांना केले परत
Wathar Police Successfully Track and Recover 14 Stolen Phones: पथकातील कर्मचाऱ्यांनी सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांतून चोरीचे मोबाईल वापरणाऱ्याशी वारंवार संपर्क करून ही मोहीम राबविली. पोलिसांनी गहाळ झालेले २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल हस्तगत करून ते मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आले.
Wathar police recover 14 stolen mobiles and return them to original ownersSakal
वाठार स्टेशन: येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल परत मिळवले आहेत. हे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरीला किंवा हरवले होते. आता ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.