पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार निलंबित

Police Inspector Bajirao Powar suspended
Police Inspector Bajirao Powar suspended

नगर : अवैध वाळूचोरीचे वाहन सोडण्यासाठी तडजोड केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना तत्काळ निलंबित केले. पोलिस खात्याला अशोभनीय कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.


अधिक माहिती अशी, चोरीची वाळूवाहतूक करणारे वाहन पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तडजोड करून सोडून दिले, अशी तक्रार सचिन दशरथ गोरे (रा. नगर) यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे केली होती.
त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून ही कारवाई केली.


दि. 15 ऑगस्ट रोजी भाळवणी ते जामगाव रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहन पारनेर पोलिसांनी पकडले होते. तडजोड केल्याचा प्रकार पोलिस खात्याला काळिमा फासणारा आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करून पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, असे तक्रारअर्जात म्हटले होते. त्या बाबतचे रेकॉर्डिंगही पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.


दरम्यान, यापूर्वी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यावर खंडणीची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर लगेच वाळूचोरी करणारे वाहन तडजोड करून सोडून दिल्याची तक्रार झाली होती.


पोवार यांच्या जागी गवळी
पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार निलंबित झाल्यानंतर पारनेर पोलिस ठाण्याचे पद रिक्त झाले. त्यांच्या जागी कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com