लाच रक्कमेसह पोलिस उपनिरीक्षक पळाला

रुपेश कदम
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मलवडी (सातारा): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याचे लक्षात येताच लाचेच्या रकमेसह पोलिस उप निरीक्षक पळून गेल्याची घटना आज दहिवडी येथे घडली.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांचे बिअर बार हॉटेलवर झालेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला न पाठविण्यासाठी दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक सतीशराज दबडे यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 8 ऑगस्ट रोजी केली होती. तडजोडी अंती दबडे यांनी तेरा हजार रुपयांची लाच मागणी केली होती.

त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहिवडी पोलिस ठाण्याजवळ सापळा रचला होता. पोलिस उप निरीक्षक दबडे यांनी तक्रारदार यास आपल्या खाजगी चार चाकी गाडीत घेवून गाडी पोलिस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढली. चालू गाडीत त्यांनी तक्रारदार याचेकडून तेरा हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारली. लाच रक्कम स्विकारल्याचे लक्षात येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण आपण सापळ्यात अडकलोय हे लक्षात येताच दबडे यांनी भरधाव वेगात तिथून आपली गाडी काढली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक अशोक शिर्के यांनी दबडे यांना पकडण्यासाठी त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. साधारण दहा किलोमीटरच्या आसपास अंतर हा थरारक पाठलाग सुरु होता. पण दबडे हे शिर्के यांच्या हाती लागले नाहीत व दबडे हे लाच रकमेसह पळून जाण्यात यशस्वी ठरले.

सदर कारवाईतील संशयीत पोलिस उप निरीक्षक सतीशराज दबडे यांच्या विरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. या सापळा कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलिस उप अधिक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलिस कॉन्स्टेबल अजित कर्णे, विनोद राजे, संभाजी काटकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: Police inspector escaped with bribe at satara