लाचखोरीत पुन्हा पोलिसांचीच आघाडी! 

Police lead again in bribery
Police lead again in bribery


नगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2019मध्ये जानेवारी ते डिसेंबरदरम्यान एकूण 32 सापळे यशस्वी केले असून, त्यांत 41 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यातही पोलिस विभागाने सलग दुसऱ्या वर्षी आघाडी कायम ठेवली आहे. लाचखोरीत दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्षभरात महसूलच्या 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

 
जानेवारी ते डिसेंबर 2018 या काळात जिल्ह्यात लाच घेतल्याचे एकूण 27 गुन्हे दाखल झाले होते. त्यात वर्ग एकचे दोन व वर्ग दोनचे तीन, वर्ग तीनचे 24 आणि सहा खासगी व्यक्ती, अशा 35 आरोपींचा समावेश होता. जानेवारी ते डिसेंबर 2019 या काळात लाच घेतल्याचे एकूण 32 गुन्हे दाखल झाले. त्यात वर्ग एकचे दोन, वर्ग दोनचे दोन, वर्ग तीनचे 26 आणि अकरा खासगी, अशा 41 जणांचा समावेश आहे.

लाचेच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांत पोलिसांचा पहिला क्रमांक कायम आहे. दुसरे स्थान महसूल विभागाने दुसऱ्या वर्षातही कायम ठेवले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडूनही लाचेचे 2018मध्ये तीन व 2019मध्ये तीन गुन्हे घडले आहेत.


गेल्या दोन वर्षांच्या कारवाईचा आलेख पाहता, लाचेच्या गुन्ह्यात अडकलेल्यांमध्ये वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची संख्या फक्त नऊच आहे. मात्र वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 आहे. 

लाचेचे कोणावर किती गुन्हे? 
2018 ः महसूल ः आठ, पोलिस ः नऊ, जिल्हा परिषद ः तीन, भूमी अभिलेख ः तीन, पाटबंधारे ः एक, अन्न व औषध प्रशासन ः एक, वैधमापनशास्त्र ः एक, आदिवासी विकास ः एक. 

2019 ः महसूल ः पाच, पोलिस ः दहा, शिक्षण ः एक, जिल्हा परिषद ः तीन, इतर लोकसेवक ः एक, नगरविकास ः दोन, वन विभाग ः एक, वन्य जीव (संरक्षण) ः एक, पाटबंधारे ः एक, समाजकल्याण ः एक, आदिवासी विकास ः एक, भूमिअभिलेख ः एक, कृषी ः एक, विद्युत ः एक, वस्तू व सेवा कर ः एक, आरोग्य ः एक. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com