तूरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात नागाव (नि.) (ता. तासगाव) येथील संकेत सुरेश पाटील हे पोलिस शिपाई चालक म्हणून कार्यरत होते.
तासगाव : तालुक्यातील तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात (Turchi Police Training Center) कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई संकेत सुरेश पाटील कामावरून घरी परतताना मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू (Accident Case) झाला. अवघ्या बारा तासांच्या कालावधीत तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने प्रशिक्षण केंद्रावर शोककळा पसरली होती.