मोहोळ : पोलिस कर्मचाऱ्यांची दिवाळी पोलिस ठाण्यातच

police
police

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची तसेच दिवाळीसाठी आलेल्या माहेरवाशीणी व नववधुंची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, तसेच कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पंन्नास पोलिस कर्मचाऱ्यांची दिवाळी पोलिस ठाण्यातच झाली, दिवाळीच्या कालावधीत कोठेही अनुचित प्रकार न घडता मंगलमय वातावरणात दिवाळी साजरी झाली व सर्वसामान्याच्या चेहऱ्यावरील हसु पाहुन आमची दिवाळी साजरी झाल्याचा आम्हाला आनंद असल्याचे पोलिस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले.

मोहोळ तसा राज्याच्या चर्चेतला तालुका तालुक्यात घोडेश्वर, पेनूर, नरखेड, अनगर , टाकळी सिकंदर, कुरुल, कामती, शेटफळ या मोठ्या बाजार पेठा आहेत. दिपवाळी निमीत लाखांची उलाढाल या ठिकाणी होत असते. चार दिवसांची दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक माहेरवाशीण व नववधु माहेरी येतात. त्यांची व सर्वसामान्याची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी दक्षता घेतली.

मोहोळ पोलिस ठाण्यात पंचान्नव पोलिस कर्मचारी व आठ अधिकारी आहेत. त्यापैकी निम्मे दिवाळीसाठी सुट्टीवर गेले आहेत. राहिलेल्या कर्मचाऱ्यापैकी शक्य तेवढे व जो शहरात वा तालुक्यात राहातो, त्याला त्याच्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्याची संधी दिली , त्यामुळे त्यांनाही समाधान मिळाले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटाके फोडण्याच्या निर्देशानुसार शहरातील व तालुक्याच्या ग्रामिण भागातील जनतेने नियमाचे पालन करुन पोलिस प्रशासनाला मोठे सहकार्य केल्या बद्दल कोकणे यांनी आभार मानले. सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात झाली व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पहायला मिळाले हीच आंम्हा पोलीसांची  दिवाळी असल्याचे कोकणे यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com