डाॅक्टरांना खंडणी मागणाऱयांना माेका लावा ; आयएमएची मागणी

डाॅक्टरांना खंडणी मागणाऱयांना माेका लावा ; आयएमएची मागणी

सातारा ः रुग्णांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या डॉक्‍टरांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होत आहे. बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी होत आहे. या प्रवृत्तींच्या लोकांवर मोकांतर्गत (संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करावी, अशी मागणी आयएमएद्वारे (इंडियम मेडिकल असोसिएशन) पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. 
या पत्रकार परिषदेस आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा, आयएमए साताराचे अध्यक्ष डॉ. जीवन लाहोटी, सचिव डॉ. सुरेश कंधारे, डॉ. राजेश गायकवाड, डॉ. भगवान पितळे, डॉ. मिलिंद काकडे, डॉ. सुधाकर बेंद्रे आदी उपस्थित होते. 
डॉ. सावंत म्हणाले, ""लोणंद (ता. खंडाळा) येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये अनिकेत योगेश भोसले (रा. निंबुत, ता. बारामती) याचे उपचाराचे पैसे भरण्याच्या कारणावरून रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कार्याध्यक्षा सौ. तेजश्री प्रवीण पवार (रा. स. नं. 49/3 श्रमिकनगर, धानोरी पुणे), संपर्कप्रमुख प्रशांत गायकवाड, सचिव पुणे शहर सौ. स्वाती भोसले व फोटोग्राफर व अन्य चार जण यांनी ता. 22 जून ते 3 जुलै दरम्यान श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये येऊन गोंधळ घालून अर्वाच्च भाषेत मला व माझे सहकारी, इतरांना धमकी देऊन त्यांच्यापैकी सौ. तेजश्री प्रवीण पवार यांनी मी तुमचे हे प्रकरण मिटवते व माझ्या सोबत आलेले प्रशांत गायकवाड व सौ. स्वाती भोसले यांनाही गप्प बसवते, असे म्हणून दहा लाख रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत तर तुमच्या हॉस्पिटलच्या नावाची बदनामी करू, अशी धमकी देत सोशल मीडियातून आमची व हॉस्पिटलची बदनामी केली. 
या प्रकरणी तेजश्री प्रवीण पवार, प्रशांत गायकवाड, स्वाती भोसले, शैलेश खुंटे व इतर चार जण अशा आठ जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 
या वेळी आयएमएच्या विविध शाखांमधील पदाधिकारी व सदस्यांनी गुंड प्रवृत्तींच्या लोकांवर मोकांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याचे नमूद केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com