नगर - पोलिस उपनिरीक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा

राजेंद्र सावंत
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पाथर्डी (नगर) : दारुच्या नशेत तर्र...होऊन बिअरबारमधे हॉटेल चालक व ग्राहकांना मारहाण केली. सोडविण्यासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्याही श्रीमुखात भडकावली. पिस्तुलचा धाक दाखवुन दहशत निर्माण केली. हा प्रताप पोलिस सेवेत असलेल्या पोलिस उपनरीक्षकाने व त्याच्या तीन साथीदारांनी गुरुवारी रात्री मधुबन हाँटेलमधे केला.

दारुच्या नशेतील पोलिस उपनिरीक्षकाला व त्याच्या एका साथीदाराला अटक केली. दोघेजण फरार झाले आहेत. पाथर्डी येथील शेवगाव रस्त्यावर मधुबन हॉटेल आहे. अमोल तानाजी मालुसरे व त्याचे तीन साथीदार गुरुवारी रात्री हाॉटेलमधे आले. तेथे एकोणीस बियर, पाण्याच्या बाटल्या व काही स्नॅक्स घेतले. हॉटेल चालक मल्हारी शिरसाट यांनी साडेचार हजार रुपये बिल झाल्याचे सांगितले. याचा राग येऊन अमोल मालुसरे यांने स्वतःकडील पिस्तुल काढुन काऊंटरवर आपटुन दहशत निर्माण केली.

चालक व ग्राहकांना मारहाण केली. पोलिसांना सदर घटनेचे माहीती मिळाली. काही वेळातच पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर सहकाऱ्ंयासह हॉटेलमधे पोहचले. अमोल मालुसरे याने पेठकर यांच्या श्रीमुखात भडकावली. यावेळी मालुसरे याचे दोन साथीदार पळुन गेले. अमोल मालुसरे (रा.शेवगाव) व सागर बन्सी तिजोरे (खुटेफळ,ता.शेवागाव) यांना पोलिसांना अटक केली.

वैद्यकिय तपासणी केल्यानंतर मालुसरे दारु प्यायला असल्याचे आढळुन आल्याचे पोलिसांनी सांगितले. मालुसरे याने सुमारे तासभर धिंगाणा घातला. हॉटेल चालक मल्हारी म्हातारदेव शिरसाट याने पोलिसात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, मालमत्तेचे नुकसान करणे, आर्म अँक्ट (3/30), संगनमत करुन मारहाण करणे, मुंबई दारुबंदी अधिनियम (85/1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी पिस्तुल जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर तपास करीत आहेत. 

Web Title: Police sub-inspector drunk and misbehave