पोलिस अधीक्षकांकडून पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

राजकुमार शहा
शनिवार, 14 जुलै 2018

संजय रामचंद्र जाधव व सचिन शामराव गलांडे अशी त्या पोलिसांची नावे आहेत. दोड्डी ता. मंगळवेढा येथे दरोडा टाकून जाताना त्या घटनेत दोघा वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी सोलापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस आरोपींच्या मागावर होते.

मोहोळ : एका दरोड्यातील आरोपींना जीव धोक्यात घालून पकडताना झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या मोहोळ पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना प्रत्येकी दीड हजाराचे प्रोत्साहनपर बक्षिस जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांनी जाहीर केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.

संजय रामचंद्र जाधव व सचिन शामराव गलांडे अशी त्या पोलिसांची नावे आहेत. दोड्डी ता. मंगळवेढा येथे दरोडा टाकून जाताना त्या घटनेत दोघा वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी सोलापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान मोहोळ येथील उड्डाणपुलाखाली आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मोहोळ येथील पुलाखाली मोहोळ पोलिसांच्या मदतीने सापळा लावला होता.

दरम्यान, आरोपी त्याठिकाणी येताच दबा धरून बसलेले पोलिस त्यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपी व पोलिसात झटापट सुरू झाली. त्यातून पळून जाताना जवळच असलेले मोहोळ येथील शोएब कुरेशी पोलिसांच्या मदतीला गेला. मात्र, जाताना आरोपीनी त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले त्यात त्याचा मृत्यू झाला. 

मोहोळ पोलिस ठाण्यातील हवालदार संजय जाधव व वाहतूक शाखेतील हवालदार सचिन गलांडे हे दोघेही आरोपीना पकडत असताना झालेल्या झटापटीत जखमी झाले होते. मात्र, एका आरोपीला पकडण्यात यश आले. त्यावेळी मोहोळ येथील काही समाजप्रेमी नागरिकांनी जीव धोक्यात घालून कामगिरी केलेल्या दोघांना बक्षीस देऊन सन्मानित करावे, अशी मागणी केली होती. कामगिरीची दखल घेऊन प्रोत्साहनपर वरीलप्रमाणे बक्षीस जाहिर केले

Web Title: Police superintendent honors police personnel