पालकमंत्र्यांच्‍या शहरात एसपींचा पुढाकार, दिला इशारा

Tejaswi Satpute
Tejaswi Satpute

कऱ्हाड (जि. सातारा ) : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, पोलिस अधिकारी आणि आरटीओ यांच्यासमवेत पोलिस अधीक्षक सातपुते यांनी घेतलेल्या बैठकीत आज शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी तीन फेब्रुवारीची डेडलाइन देण्यात आली. शहरातील वाहतुकीच्या शिस्तीसाठी आवश्‍यक मदतीची कार्यवाही 15 फेब्रुवारीपर्यंत पालिकेने करण्याचेही या वेळी ठरवण्यात आले. 

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिस अधीक्षक सातपुते यांनी बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, गटनेते राजेंद्र यादव, विरोधी आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, बांधकाम सभापती किरण पाटील, नगरसेवक हणमंत पवार, जयंत बेडेकर, सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, आरटीओ कार्यालयाचे श्री. देसाई, पालिकेचे ए. आर. पवार यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यावर एकमत झाल्याचे सांगून पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या,"" कऱ्हाड शहरातील अतिक्रमणे तीन फेब्रुवारीला काढण्याचे ठरवले. त्याचबरोबर बस स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. त्यामध्ये अनधिकृत थांबे बंद करण्याबरोबरच सद्य:स्थितीत तेथे किती थांब्यांची आवश्‍यकता आहे, याचा अभ्यास करून कार्यवाही करण्याचेही ठरवण्यात आले.

बस स्थानकाचे पार्किंग सुरू करण्यासाठीही पत्रव्यवहार करण्यात येईल. शहरात माल घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी दुपारी 12 ते तीन या दरम्यानच माल उतरवता येईल. शाहू चौकात बॅरिगेट लावून तेथील वाहनांची गर्दी कमी करण्यात येईल.'' 
राजेंद्र यादव यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी नवा वाहतुकीचा आराखडा तयार करून तो अंमलात आणावा, असे आवाहन केले. 

अवैध रिक्षांवर धडक कारवाई 

बैठकीत अवैध रिक्षांच्याही मुद्यावर चर्चा झाली. त्यावर पोलिस अधीक्षक सातपुते यांनी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना 16 वर्षांवरील रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यातून 30 टक्के रिक्षा कमी होवून वाहतुकीला होणारा अडथळा कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com