Election Strategy by Sadabhau Khot : युती असेल तिथे युती; नसेल तेथे स्वतंत्र लढणार: आमदार सदाभाऊ खोत; भीमराव मानेंसमवेत राज्यात फिरणार
Sadabhau Khot on Alliance : ‘रयत क्रांती संघटनेची निर्मिती ही विस्थापित विरुद्ध प्रस्थापित व वाडा विरुद्ध गावगाडा यातून झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेत केलेल्या प्रवेशामुळे सामान्य माणसाच्या लढ्याला एक नवं वळण, नवी दिशा मिळणार आहे.
इस्लामपूर : रयत क्रांती संघटना आता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका निवडणुका लढवणार आहे. युती असेल तिथे युती आणि नसेल त्या ठिकाणी संघटना स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.