kolhapur ZP: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू
kolhapur Politics: जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच कुस्त्यांच्या मैदानात इच्छुक उमेदवारांची चुरस रंगली आहे. यात्रांमध्ये गावागावात रंगणाऱ्या कुस्त्यांमध्ये आता फक्त पैलवानच नव्हे तर राजकारणी नेतेही ताकद दाखवताना दिसत आहेत. बक्षिसांच्या वर्षावातून आपली ओळख निर्माण करण्याची चढाओढ सुरू आहे.
पट्टणकोडोल: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच भावी उमेदवारांनी राजकीय फटाके फोडायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रा, उरूस सुरू आहेत. त्यात गावोगावी कुस्त्यांचे फड रंगले आहेत.