esakal | सोशल मीडियावर 'हे' रंगले राजकीय विनोद
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावर 'हे' रंगले राजकीय विनोद

मोबाईलचा काय प्रॉब्लेम झालाय देव जाणे, उद्धव टाइप केलं की उद्‌ध्वस्तच येत आहे! यासह अनेक गमतीशीर मेसेज शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. 

सोशल मीडियावर 'हे' रंगले राजकीय विनोद

sakal_logo
By
परशुराम कोकणे

सोलापूर : शपथविधी होता का? दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी सकाळी आटोपला... म्हणून जुनी माणसं साखरपुड्यात आणि लग्नात जास्त अंतर ठेवत नव्हती... मोबाईलचा काय प्रॉब्लेम झालाय देव जाणे, उद्धव टाइप केलं की उद्‌ध्वस्तच येत आहे! यासह अनेक गमतीशीर मेसेज शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. 

हेही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं दिवसभरात?

विनोदवीरांची राजकीय खेचाखेची
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर सोशल मीडियावर विनोदवीरांनी राजकीय खेचाखेची करणाऱ्या मेसेजचा जणू पाऊसच पाडला. एकीकडे वृत्तवाहिन्यांबाबत बातम्या सुरू होत्या तर इकडे व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेक विनोद शेअर केले जात होते. दिवस दिवस चर्चा करून काही उपयोग नाही, शेवटी निर्णय रात्रीच होतात हे सिद्ध झाले! हा मेसेज तर अनेक ग्रुपवर दिसून आला.

हेही वाचा : अमित शहांचे 'रात्र'कारण पुन्हा यशस्वी!

माझा तर अजून प्रातर्विधी पण झाला नाय..
राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळी उठल्यावर अंघोळ न करता शपथविधी पूर्ण झाला... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात शेतीच्या प्रश्‍नांवर जी एक तास चर्चा झाली, त्याचेच पीक आज आलेले आहे... माझा तर अजून प्रातर्विधी पण झाला नाय... अन्‌ यांचा शपथविधी पण झाला... याला म्हणतात खरी राजकीय खेळी... पोट तर टरारून भरलं पाहिजे... अन्‌ ढेकर पण द्यायची नाही..! मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण इतक्‍या सकाळी सकाळी याल असं वाटलं नव्हतं..! आजची शिकवणूक : एक - कमी बोला आणि दोन - सकाळी लवकर उठा... यासह अनेक मेसेजनी शनिवारचा दिवस नेटिझन्सनी आनंदाने घालवला.