महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं दिवसभरात; वाचा एका क्लिकवर

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांना एकत्र ठेवण्यापर्यंत अनेक घाडमोडी झाल्या आहेत. 

मु्ंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी (ता.23) सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्यानंतर दिवसभर नाट्यमय घडामोडींचा सिलसिला सुरूच होता. शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. काँग्रेसने यापूर्वीही केली होती आजही केली आहे. त्यात आता राष्ट्रवादीनेही बंडखोरी रोखण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय रात्री उशिरा घेतला. पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांना एकत्र ठेवण्यापर्यंत अनेक घाडमोडी झाल्या आहेत. 

शपथविधीनंतरच्या घडामोडी :

सकाळी 9 : अजित पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत 
9.27 : जनतेच्या हितासाठी सरकार आवश्‍यक होते : सुधीर मुनगंटीवार 
 9.42 : अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, पाठिंबा नाही : शरद पवार 
10.45 : स्थिर सरकार देण्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा 
10.48 : 'वर्षा'वर भाजप नेत्यांची बैठक 
10.58 : पक्षात आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांचे ट्विट 
11.00 : बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत 
दुपारी 12.48 : शरद पवार, उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद 
3.53 : सुनील तटकरे, दिलीप वळसे हे अजित पवारांच्या भेटीला 
4.30 : देवेंद्र फडणवीस भाजप मुख्यालयात, स्थिर सरकारची ग्वाही 
5.15 : अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश 
5.30 : राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक

घटनाक्रमाशी संबंधित बातम्या :

- महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

- अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

- पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

- आमचं ठरलंय! भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार

- अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

- 'चूक विसरून अजित पवार यांनी परत यावं'; 'या' मोठ्या नेत्याचं 'मोठं' वक्तव्य!

- अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी; जयंत पाटील यांच्याकडे सूत्रे

- राष्ट्रवादीचे पाच आमदार अजूनही नॉटरिचेबल!

- शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened in the politics of Maharashtra on Saturday