सर्वपक्षीय फेरीवाल्यांचा  लवकरच होणार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या आडमुठ्या धोरणांविरुद्ध लवकरच फेरीवाल्यांचा मेळावा घेण्याचा निर्णय आज सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईबद्दल चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी फेरीवाल्यांचा मेळावा घेण्यात यावा व मेळाव्यात फेरीवाल्यांच्या कायद्याविषयी तसेच त्यांना मिळणाऱ्या अधिकारांविषयी माहिती दिली जाणार आहे. शहरातील सर्व फेरीवाल्यांनी या मेळाव्यात सहभागी होणे आवश्‍यक आहे. 

फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्याचे धोरण असताना सर्व्हे करण्यापूर्वी त्यांना हटवून कोणता सर्व्हे करणार आहात, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला. कायदेशीर अंमलबजावणीसाठी संघर्ष करण्यासाठी भागाभागातील फेरीवाल्यांशी संपर्क करून त्यांना या आंदोलनात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

बैठकीस दिलीप पवार, आर. के. पोवार, सुभाष वोरा, नंदकुमार वळंजू, महंमद शेख, अशोक भंडारी, रमाकांत उरसाल, विजय नागावकर, सुरेश जरग, समीर नदाफ, बाळासाहेब प्रभावळे, सुमन घोसे, दिलीप बावणे, अजय एकबोटे, स्वामी, राजा महाडिक, किरण गवळी आदी उपस्थित होते.

Web Title: Political rally will soon

टॅग्स